PHOTOS

बाप-लेकीची जोडी चमकविणार प्रभासचं नशीब? 'Salaar' सह 'Project K'चा कोटींचा निधी पणाला

bsp; 'आदिपुरुष' च्या वादानंतर प्रभासच्या 'Salaar' चित्रपटाच्या टीझरची तारीख ठरली आहे. 'Salaar' सह 'Project K...

Advertisement
1/10

आदिपुरुष नंतर या वर्षातील मोस्ट अवेटेड चित्रपट सालार पु्न्हा एकदा चर्चेत आला आहे. कारण प्रभासच्या या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात येणार आहे. 

 

2/10

मेकर्सने सोशल मीडियावर टीझरची तारीख जाहीर केली आहे. सालार या चिपत्रटाचे नवीन पोस्टर शेअर कर 6 जुलैला पहाटे 5.12 वाजता तो यूट्यूबवर प्रदर्शित होणार आहे. 

3/10

तर 'Salaar' हा चित्रपट 28 सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. देशभरातील चित्रपटगृहात हा प्रदर्शित होणार आहे. 

4/10

एसएस राजामौली यांच्या बाहुबली या चित्रपटाच्या दोन्ही भागानंतर प्रभास दक्षिणेतील सर्वात ब्लॉकबस्टर हिरोच्या लिस्टमध्ये पहिल्या नंबरवर आहे. पण बाहुबलीनंतर त्याचा कुठलाही चित्रपट प्रेक्षकांना रुचलेला नाही. आदिपुरुषनेही त्याची निराशा केली आहे. आता तो एका हिटच्या प्रतीक्षेत आहे. 

5/10

सालार नंतर प्रभासचा प्रोजेक्ट के पुढच्या वर्षी म्हणजे  2024 मध्ये जानेवारीमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या दोन चित्रपटाकडून प्रभासला खूप अपेक्षा आहे. या दोन्ही चित्रपटासाठी कोट्यांचा पैशा खर्च झाला आहे. 

6/10

प्रभासच्या या दोन्ही चित्रपटाशी साऊथमधील प्रसिद्ध बाप-लेकीची जोडीचं खास नातं आहे. ही जोडी त्याच्या या दोन चित्रपटाला तारु शकणार का हे पाहण औत्सुकाचं ठरणार आहे. 

7/10

प्रभासच्या सालारमध्ये श्रुती हासन अभिनेत्री आहे. तर प्रोजेक्ट के मध्ये कमल हसनची खास भूमिका आहे. 

8/10

केजीएफ याच्या फॅन्ससाठी खास बातमी आहे. सालार आणि केजीएफ यांचं विशेष कनेक्शन आहे. 

9/10

प्रशांत नीलचा सालारमध्ये यश मुख्य भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्याशिवाय सालार देखील केजीएफप्रमाणेच कोळसा खाणीत तयार करण्यात आला आहे. एवढंच नाही तर प्रभासचा लूक देखील हुबेहुब केजीएफमधील रॉकी भाईसारखा दिसतोय. 

 

10/10

बजेटबद्दल बोलायचं झालं तर 'सालार'चं बजेट 200 आणि 'प्रोजेक्ट के'चं बजेट 600 कोटींचा घरात गेलं आहे. त्यामुळे 800 कोटी रुपये प्रभासचे पणाला लागले आहेत. 

 





Read More