रणवीर सिंह होणार आई-बाबा. या दिवशी दीपिका देणार तिच्या मुल...
लवकरच अभिनेत्री दीपिका पादुकोण आई होणार आहे. दीपिका आणि रणवीर देखील त्यांच्या पहिल्या बाळाच्या जन्मासाठी खूप उत्सुक आहे.
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांच्या लग्नाला 6 वर्षे पूर्ण झाली आहेत. 6 वर्षानंतर दीपिका आणि रणवीर आई-बाबा होणार आहेत.
प्रेग्नेंसीच्या घोषणेसोबतच दीपिकाने सांगितले होते की तिची डिलिव्हरी सप्टेंबरमध्ये होणार आहे. त्यानुसार 28 सप्टेंबरला डिलिव्हरी होण्याची शक्यता आहे.
याआधी दीपिका आणि रणवीरच्या मुलाचा जन्म लंडनमध्ये होणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र, आता दीपिका मुंबईतील रुग्णालयात मुलाला जन्म देणार असल्याचं निश्चित झालं आहे.
आई होण्यापूर्वी दीपिका तिचा ब्रेक टाईम एन्जॉय करत आहे. डिलिव्हरीनंतर देखील ती पाच महिने बाळासोबत राहणार आहे.
डिलिव्हरीनंतर दीपिका ही मार्च महिन्यानंतर तिच्या आगामी प्रकल्पांवर लक्ष केंद्रित करणार आहे.