PHOTOS

मैत्रिणीचा संसार मोडत तिच्याच पतीशी 'या' अभिनेत्रीनं केलं लग्न; नात्याची 15 वर्ष पूर्ण होताच म्हणते...

समीकरणं कधी आणि किती वेगानं बदलतात हेच मुळात या सेलिब्रिटींकडे पाहताना लक्षात येतं. अशाच एका नात्यानं फार आधीपासूनच सर्वांच्...

Advertisement
1/7
तणावामुळं नातं चर्चेत
तणावामुळं नातं चर्चेत

हे नातं चर्चेत आलं तेच मुळात एका तणावामुळं. कारण, एका अभिनेत्रीनं चक्क तिच्याच मैत्रिणीच्या पतीवर प्रेम करत त्याच्याशीच लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. हिंदी कलाजगतामध्ये अवघ्या काही चित्रपटांमधून झळकलेली एक अभिनेत्री तिच्या कारकिर्दीमुळं नव्हे, तर तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेचा विषय ठरली. 

 

2/7
वैवाहिक नात्याची 15 वर्ष
वैवाहिक नात्याची 15 वर्ष

यंदा वैवाहिक नात्याची 15 वर्ष साजरा करणारी ही अभिनेत्री कोण माहितीये? ही आहे मलायका अरोराची बहीण, अमृता अरोरा. 2009 मध्येच अमृतानं व्यावसायिक शकील लडक याच्याशी लग्न केलं होतं. 

3/7
नातं चर्चेत
नातं चर्चेत

अमृता आणि शकील यांचं नातं चर्चेत आलं कारण, तिनं आपल्याच खास मैत्रिणीच्या पतीवर प्रेम करत त्याला पती म्हणन निवडलं होतं. निशा राणा नावाच्या मैत्रिणीचा पती असणाऱ्या शकीलवर अमृता भाळली. 

4/7
असं म्हणतात की...
असं म्हणतात की...

असं म्हणतात की, अमृता आणि शकील सुरुवातीला एकमेकांचे चांगले मित्र होते. त्यानंतर त्यांची ही मैत्री प्रेमात रुपांतरित झाली आणि पुढं या नात्यात जवळीक वाढली. इतकी, की त्या दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. शकीलनं पत्नी, निशाला घटस्फोट देत अमृताशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 

5/7
लग्नाची बातमी
 लग्नाची बातमी

अमृता आणि शकीलच्या लग्नाची बातमी वाऱ्यासारखी पसरली. किंबहुना ती लग्नाआधीच गरोदर असल्याच्या चर्चाही त्यावेळी गाजल्या आणि अनेकांच्याच भुवया उंचावल्या. 

 

6/7
लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि...
लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि...

जेव्हा निशाचा पती असणाऱ्या शकीलनं अमृताशी लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा निशानं मलायकाच्या बहिणीवर तिच्या वैवाहिक नात्यात मीठाचा खडा टाकण्याचा आरोप लावला होता. 

7/7
जाहीर आरोप...
जाहीर आरोप...

माध्यमांना दिलेल्या मुलाखतीमध्ये निशानं जाहीरपणे अमृतावर काही गंभीर आरोप केले होते. अमृतानं आपलं वैवाहिक आयुष्य उध्वस्त केल्याचा गंभीर आरोप तिनं केला होता. 

 





Read More