PHOTOS

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्याची लव्हस्टोरी बाल्कनीतून झाली सुरु; लग्नात आल्या अडचणी

श्वर्या रायसोबत प्रेम झालं. त्यांची लव्ह स्टोरी कशी पुढे गेली? त्यानंतर त्यांच्या लग्...

Advertisement
1/9
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्याची लव्हस्टोरी बाल्कनीतून झाली सुरु; लग्नात आल्या अडचणी
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्याची लव्हस्टोरी बाल्कनीतून झाली सुरु; लग्नात आल्या अडचणी

Abhishek Bachchan Aishwarya Love Story: बॉलिवूडचा 'गुरु' अभिषेक बच्चनने गेल्या काही वर्षात अनेक प्रकारच्या भूमिका साकारल्या. थिएटरपासून ओटीटीपर्यंत सर्वच ठिकाणी त्याने स्वत:ला सिद्ध केले आहे. आज तो आपला 48 वा वाढदिवस साजरा करत आहे. 

2/9
15 सिनेमे फ्लॉप
15 सिनेमे फ्लॉप

आपल्या करिअरमध्ये त्याने खूप स्ट्रगल केले. एक वेळ अशीही होती की त्याचे सलग 15 सिनेमे फ्लॉप गेले. पण 'गुरु' सारख्या दमदार सिनेमाने त्याचे नशिब पालटले.

3/9
लव्ह स्टोरी
लव्ह स्टोरी

यानंतर त्याच्या आयुष्यात अप्सरा आली. जिचे स्वप्न सारे जग पाहत होते. त्याला विश्वसुंदरी अभिनेत्री ऐश्वर्या रायसोबत प्रेम झालं. त्यांची लव्ह स्टोरी कशी पुढे गेली? त्यानंतर त्यांच्या लग्नात कशाप्रकारची अडचण आली? जाणून घेऊया. 

4/9
प्रेमाची सुरुवात
प्रेमाची सुरुवात

अभिषेक आणि ऐश्वर्याच्या प्रेमाची सुरुवात 2000 साली झाली. 'ढाई अक्षर प्रेम के' सिनेमादरम्यान दोघांची मैत्री आणि प्रेम झाले. ऐश्वर्याने 2003 मध्ये आलेल्या 'कुछ ना कहो' सिनेमात अभिषेकसोबत काम केले. 

5/9
धूम 2 मध्येही दिसले
 धूम 2 मध्येही दिसले

यानंतर 2006 मध्ये ते दोघे एकत्र दिसले. पुढे धूम 2 मध्ये पुन्हा एकदा ऐश्वर्या आणि अभिषेकने एकत्र काम केले आणि आपल्याला आयुष्य एकत्र घालवण्याचा निर्णय घेतला. 

6/9
हटके स्टाइलने प्रपोज
हटके स्टाइलने प्रपोज

अभिषेकला ऐश्वर्याचा हात मागायला होता. यासाठी त्याने हटके स्टाइलने प्रपोज करण्याचा निर्णय घेतला. अभिषेकने ओपरा विन्फेच्या शोमध्ये या आठवणींना उजाळा दिला. 

7/9
बाल्कनीत घेऊन प्रपोज
बाल्कनीत घेऊन प्रपोज

न्यूयॉर्कमध्ये एक सिनेमाच्या शूटींगदरम्यान आपल्या हॉटेलच्या बाल्कनीत उभा होता. ऐश्वर्यासोबत लग्न झालं तर किती चांगल होईल, असा विचार करत होता. मग तो ऐश्वर्याला त्याच बाल्कनीत घेऊन गेला आणि तिथेच त्याने प्रपोज केला.

8/9
लग्नाआधी पूजा
 लग्नाआधी पूजा

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांचे लग्न चर्चेत राहिले. कारण दोघांच्या लग्नात कुंडली दोषने मोठी अडचण आणली. यासाठी त्यांना लग्नाआधी पूजा करावी लागली.

9/9
20 एप्रिल 2007 रोजी लग्न
 20 एप्रिल 2007 रोजी लग्न

यानंतर 4 जानेवारी 2007 ला ऐश्वर्या आणि अभिषेकने साखरपुडा केला आणि 20 एप्रिल 2007 रोजी लग्न केले. 





Read More