PHOTOS

खूपच रंजक आहे एबी डिव्हिलियर्सची प्रेमकहाणी, ताजमहल समोर मैत्रिनीला केलं होतं प्रपोज

एबी डिव्हिलियर्सने 19 नोव्हेंबरच्या सकाळी सर्वांना आश्चर्यचकित केले आणि आता त्याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे....

Advertisement
1/5

दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) क्रिकेटर एबी डिव्हिलियर्सची (AB de Villiers) पत्नी डॅनियल स्वार्ट (Danielle Swart) खूप क्यूट आहे, क्रिकेट चाहत्यांनाही ती खूप आवडते.

2/5

एबी डिव्हिलियर्सची प्रेमकहाणी खूप रंजक आहे. तो त्याची गर्लफ्रेंड डॅनियल स्वार्ट हिला 5 वर्षांपासून डेट करत होता. यादरम्यान दोघेही एकमेकांच्या खूप जवळ आले.

3/5

एबी डिव्हिलियर्सने 2012 साली आग्रा येथील ताजमहाल (Taj Mahal) समोर डॅनियल स्वार्टला फिल्मी स्टाईलमध्ये प्रपोज केले होते. त्यावेळी आयपीएल स्पर्धेमुळे हे जोडपे भारतात उपस्थित होते.

4/5

दक्षिण आफ्रिकेतील बेला-बेला शहरात 30 मार्च 2013 रोजी एबी डिव्हिलियर्स आणि डॅनियल स्वार्ट यांनी शाही पद्धतीने लग्न केले.

5/5

एबी डिव्हिलियर्स आणि डॅनियल स्वार्ट आज खूप आनंदी जीवन जगत आहेत. निवृत्तीनंतर 'मिस्टर 360 डिग्री' पत्नी 2 मुले आणि 1 मुलीसोबत आनंदात वेळ घालवतील.





Read More