PHOTOS

..नाहीतर आज नारायण मूर्ती 'विप्रो'साठी काम करत असते; अजीम प्रेमजींच्या 'त्या' एका चुकीमुळे जन्मली Infosys

ection Narayana Murthy: देशातील आघाडीच्या आयटी कंपन्यांच्या यादीत दुसऱ्या स्थानी असलेली कंपनी ही सध्या सर्वात मोठा स्पर्धक असलेल्या कंप...

Advertisement
1/10

इन्फोसिस आज भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी आयटी कंपनी आहे. मात्र या कंपनीची सुरुवात कशी झाली याची गोष्ट फारच रंजक आहे. एन. आर. नारायण मूर्ती यांनी ही कंपनी पत्नी सुधा मूर्ती यांच्याकडून 10 हजार रुपये उसणे घेऊन 6 मित्रांसहीत सुरु केली होती.

 

2/10

'इन्फोसिस'बद्दल तुम्ही अनेकदा वाचलं असेल, ऐकलं असेल. मात्र इन्फोसिसचे सहसंस्थापक असलेल्या नारायण मूर्तींनी कंपनीच्या स्थापनेसंदर्भात बोलताना कंपनी सुरु करण्यामागील मोठ्या कारणाचा खुलासा केला आहे. इन्फोसिस सुरु करण्यामागील मूळ कारण अब्जाधीश अजीम प्रेमजी हे असल्याचं मूर्ती म्हणाले होते. तसेच त्यांना त्यांनी घेतलेल्या या निर्णयाचा पश्चातापही झालेला.

3/10

माहिती तंत्रज्ञान श्रेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या 'विप्रो'चे सर्वेसर्वा अजीम प्रेमजी यांच्यामुळेच इन्फोसिस अस्तित्वात आल्याचं मूर्ती यांनी सांगितलं आहे. आज इन्फोसिस देशातील 3 अव्वल आयटी कंपन्यांपैकी एक आहे.

4/10

नारायण मूर्ती यांनी एका मुलाखतीमध्ये इन्फोसिसच्या स्थापनेमागील अजीम प्रेमजी कनेक्शनवर प्रकाश टाकल्याचं वृत्त 'बिझनेस टुडे'ने दिलं आहे. मी नोकरी शोधत होतो तेव्हा मी 'विप्रो'साठी अर्ज केला होता. मात्र त्या अर्जावरुन अजीम प्रेमजींच्या कंपनीने नारायण मूर्तींना नोकरी देण्यास नकार दिला.

5/10

नारायण मूर्तींनी पहिल्यांदा आयआयएम अहमदाबादमध्ये एक रिसर्च असोसिएट म्हणून नोकरी केली. तिथे त्यांनी चीफ सिस्टीम प्रोग्रामर म्हणून काम सुरु केलं. इन्फोसिस  अस्तित्वात येण्याआधी त्यांनी सॉफ्ट्रोनिक्सची स्थापना केली. मात्र या कंपनीला यश मिळालं नाही. ही कंपनी पंद झाल्यानंतर मूर्ती यांनी पुण्यातील पाटणी येथे कंप्यूटर सिस्टम्समध्ये नोकरी केली. यादरम्यान त्यांनी विप्रोमध्ये नोकरीसाठी अर्ज केला होता. मात्र तो स्वीकारण्यात आला नाही.

6/10

इन्फोसिसचे सहसंस्थापक असलेल्या मूर्ती यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'विप्रो'ने नोकरीचा अर्ज फेटाळल्याने इन्फोसिसचा जन्म झाला. आजच्या घडीला इन्फोसिस ही 'विप्रो'च्या प्रमुख स्पर्धक कंपन्यांपैकी एक आहे.

7/10

यानंतर एका भेटीदरम्यान अजीम प्रेमजी यांनी त्यांच्याशी बोलताना तुम्हाला आम्ही नोकरीवर घेतलं नाही ही आमच्या सर्वात मोठ्या चुकांपैकी एक होती असं सांगितल्याचंही मूर्ती म्हणाले. मी त्यावेळी विप्रोममध्ये नोकरीला लागलो असतो तर माझ्यासाठी आणि अजीम प्रेमजींसाठी गोष्टी फारच वेगळ्या असत्या.

8/10

आज इन्फोसिसचे बाजारमूल्य 6.65 लाख कोटी रुपये इतकं असून कंपनी अमेरिका, ब्रिटनसहीत जगभरातील अनेक प्रमुख देशांमध्ये पसरलेली आहे. इन्फोसिस ही भारतातील 10 सर्वात मौल्यवान कंपन्यांपैकी एक आहे. दुसरीकडे 'विप्रो'चे बाजारमूल्य हे 2.43 लाख कोटी इतकं आहे.

9/10

नारायण मूर्तींनी 1981 साली 6 मित्रांच्या मदतीने कंपनी सुरु करण्याचा विचार केला होता. त्यावेळी ते पत्नी सुधाबरोबर एका रुमच्या घरात राहत होते. कंपनीचं नाव इन्फोसिस असं निश्चित झालं.

10/10

आपला वाटा देण्यासाठी मूर्ती यांनी पत्नीकडून 10 हजार रुपये उधार घेतले होते. पुण्यातील एका अपार्टमेंटमधून इन्फोसिसची सुरुवात झाली. 1983 मध्ये कंपनीचं मुख्य कार्यालय पुण्यावरुन बंगळुरुला हलवण्यात आलं.





Read More