PHOTOS

PHOTO: भरपूर घाम येतो? 'या' 6 लक्षणांवरुन ओळखा हार्ट अटॅकचे संकेत, 80% धोका होईल कमी

igns :  हार्ट अटॅक येण्यापूर्वी शरीरात काही लक्षणे दिसतात. ज्यावरुन तुम्ही जीवघेणा प्रकार टाळू शकता. शरीरातील या 6 संक...

Advertisement
1/7
घाम येणे
घाम येणे

अनेकांना कोणताही व्यायाम, वर्कआऊट किंवा कोणतेही हालचाल करणारे काम करत नसतानाही प्रचंड घाम येतो. घामाघुम होणे, अस्वस्थता, मन घाबरणे यासारखी लक्षणे दिसल्यास, सावध व्हा. कारण हृदयापर्यंत रक्ताचा पुरवठा नीट होत नसेल. तर अशी लक्षणे दिसतात. त्यामुळे घाम येण्याकडे दुर्लक्ष करु नका. अनावश्यक किंवा रोजच्यापेक्षा जास्त घाम येत असेल तर डॉक्टरांशी संपर्क साधा. 

2/7
श्वास घेण्यास त्रास होणे
श्वास घेण्यास त्रास होणे

हार्ट अटॅक येण्याअगोदर अनेकांना श्वसनाची समस्या जाणवते. छातीत जडपणा वाटणे, अशक्तपणा आणि मन अस्वस्थ असल्यासारखं वाटणं या लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका. जर तुम्हाल बेल्ट अराऊंड चेस्ट किंवा वेट ऑन चेस्ट असं वाटत असेल तर तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधा. हृदयाला व्यवस्थीत रक्तपुरवठा होत नसेल तर श्वसनाला त्रास होतो. 

3/7
उल्टी आणि चक्कर येणे
उल्टी आणि चक्कर येणे

चक्कर येणे किंवा डोळ्यासमोर अंधारी येणे ही उन्हाची लक्षणे वाटत असली तरी त्याकडे दुर्लक्ष करु नका. कारण हे लक्षण हार्ट अटॅक येण्यापूर्वीचं आहे. या लक्षणांमुळे तुमचा ब्लड प्रेशरही कमी होऊ शकते. एवढंच नव्हे तर हृदयाला नीट रक्तपुरवठा होत नसेल तरीही ही समस्या जाणवते. त्यामुळे या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करु नका. 

4/7
मान आणि जबडा दुखणे
मान आणि जबडा दुखणे

अनेकदा ही समस्या महिलांमध्ये सर्वाधिक असल्याचे जाणवते. मान दुखणे किंवा जबडा दुखणे यासारखी लक्षणे देखील हृदयविकाराच्या झटक्यासंबंधित असू शकतात. अनेकदा याकडे दुर्लक्ष केलं जातं पण ही तितकी सामान्य बाब नाही. त्यामुळे शरीरात कोणतेही बदल दिसले तर तुम्ही तात्काळ डॉक्टरकडे जाणं आवश्यक आहे. 

5/7
पायांना सूज येणे
पायांना सूज येणे

पाय, तळव्यांना सूज येत असेल तर हार्ट अटॅकचा धोका अधिक असतो. कारण हृदयाला नीट रक्त पुरवठा होत नसेल तर ते संपूर्ण शरीराला रक्ताची कमतरता जाणवते. अशावेळी पायांना सूज येणे किंवा तळव्यांना सूज येणे यासारख्या समस्या जाणवतात. त्यामुळे पाय दुखत असेल आणि पायाला सूज येत असेल तर पहिला संपर्क डॉक्टरांशी करा. 

 

6/7
हृदयाचे ठोके वाढणे
हृदयाचे ठोके वाढणे

अनेकदा काहीही कारण नसताना हृदयाचे ठोके वाढतात आणि थकवा जाणवतो. अशावेळी या लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका. शरीराची, आरोग्याची काळजी घ्या आणि तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधा. कारण हृदयविकाराच्या झटक्याचे हे महत्त्वाचे लक्षण आहे, ज्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. 

7/7
2 दिवस आधी शरीरात दिसतात बदल
2 दिवस आधी शरीरात दिसतात बदल

जेव्हा हृदयाला रक्त आणि ऑक्सिजन पाठवणाऱ्या धमन्या ब्लॉक होतात तेव्हा हृदयविकाराचा झटका येतो. कालांतराने, धमन्यांमध्ये फॅटी, कोलेस्ट्रॉलयुक्त साठे तयार होतात. ज्यामुळे हृदयाच्या धमन्यांमध्ये प्लेक तयार होतो. अशा परिस्थितीत, प्लेक फुटतो, ज्यामुळे रक्ताची गुठळी तयार होऊ लागते, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. हृदयविकाराच्या झटक्यामुळे होणारे मृत्यू टाळण्यासाठी, आपण त्याच्या लक्षणांकडे लक्ष दिले पाहिजे. हृदयविकाराच्या काही दिवस आधी आपले शरीर अनेक प्रकारचे सिग्नल देऊ शकते. 





Read More