PHOTOS

PHOTO: लोको-पायलटला काही दिसलं कसं नाही? मुंबईच्या दिशेने येणाऱ्या एक्सप्रेसचे 18 डबे घसरले

Train Derails: झारखंडच्या चक्रधरपूरमध्ये ट्रेन अपघात घडला आहे. आज पहाटे 3.45च्या सुमारास हावडा-मुंबई मेल रूळांवरुन घसरली आहे. ...

Advertisement
1/7
7 PHOTOS: लोको-पायलटला काही दिसलं कसं नाही? मुंबईच्या दिशेने येणाऱ्या एक्सप्रेसचे 18 डबे घसरले
7 PHOTOS: लोको-पायलटला काही दिसलं कसं नाही? मुंबईच्या दिशेने येणाऱ्या एक्सप्रेसचे 18 डबे घसरले

मुंबई-हावडा रेल्वे दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला आहे तर 50 जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वीच याच मार्गावर मालगाडीचे दोन डब्बे रूळांवरुन घसरले होते. आज जिथे अपघात झाला त्याच्या बाजूच्याच रूळांवर मालगाडीचे ते डब्बे उभे होते. त्यावर ताडपत्री टाकण्यात आली होती. 

2/7

मालगाडीच्या डब्यांवर टाकण्यात आलेली ताडपत्री उडून मुंबई-हावरा एक्स्प्रेसच्या इंजिनवर आलं असेल. व त्यामुळंच ड्रायव्हरने इमरजन्सी ब्रेक लावला असेल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. 

3/7

 इमरजन्सी ब्रेक लावल्या कारणाने मेल एक्स्प्रेसच्या 18 डब्बे रूळांवरुन घसरले. तर काही डब्बे समोर उभ्या असलेल्या मालगाडीला धडक दिली. तसंच, ट्रेनचा स्पीड जास्त असल्याने रूळावरुन घसरून खाली कोसळले आहेत. 

4/7

अद्याप ट्रेनचा अपघात कसा झाला याबाबत अधृकृतरित्या कोणतीही माहिती समोर आलेली नाही. घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी ही माहिती दिली आहे. 

5/7

जेव्हा हा अपघात घडला तेव्हा प्रवासी गाढ झोपेत होते. तेव्हा अचानक जोरदार आवाज आला आणि डब्बे रूळांवरुन घसरत गेले. वरच्या बर्थवर झोपलेले काही प्रवासी खाली कोसळले तर सामान्य अस्तव्यस्त झाले. 

6/7

रेल्वेने बचावकार्य हाती घेतलं आहे. तर, जखमी झालेल्या प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दोन प्रवाशांचा मृत्यू झाला असून जखमी प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

7/7
हेल्पलाइन
हेल्पलाइन

या अपघातानंतर रेल्वेकडून हेल्पलाइन क्रमांक करण्यात आले आहेत. टाटानगरला 06572290324, चक्रधरपूर 06587 238072, राउरकेला 06612501072, 06612500244 आणि हावडा येथे 9433357920, 033263820 वर संपर्क साधता येईल.





Read More