PHOTOS

अयोध्या वादातील 11 महत्त्वाचे मुद्दे

Advertisement
1/11

1. सोमवारी सुप्रीम कोर्टाने म्हटलं की, अयोध्‍या प्रकरणाची सुनावणी लगेचच होणार नसून जानेवारीपर्यंत ती पुढे ढकलली आहे.

2/11

2. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील 3 न्यायाधीशांचं पीठ यावर सुनावणी करणार आहे.

3/11

3. सुप्रीम कोर्टामध्ये जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात अयोध्या प्रकरणावर सुनावणीची तारीख ठरवली जाईल.

4/11

4. सुप्रीम कोर्ट जानेवारीमध्ये हे देखील निश्चित करु शकतं की, अयोध्‍या प्रकरणात नियमित सुनावणी होणार की नाही.

5/11

5. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी या प्रकरणी लगेचच सुनावणी होणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

6/11

6. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाची सुनावणी नोव्हेंबरमध्ये करण्याची उत्तर प्रदेश सरकार आणि रामलला यांच्या वकिलांची मागणी फेटाळून लावली आहे.

7/11

7. याआधी सुनावणी तत्कालीन सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्यासोबत न्यायाधीश अशोक भूषण आणि अब्दुल नजीर यांच्या पीठाअंतर्गत होत होती. दीपक मिश्रा हे निवृत्त झाल्यानंतर सोमवारी झालेल्या सुनावणीत तिनही न्यायाधीश वेगळे होते.

8/11

8. मागच्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने मुस्लीम पक्षाला मोठा धक्का दिला होता. सुप्रीम कोर्टाने 1994 मध्ये इस्माइल फारुकीच्या निर्णयावर पुनर्विचार करण्यासाठी नकार दिला होता. मुस्लीम पक्षाने नमाजसाठी मशीद हा इस्लामचा महत्त्वाचा भाग असल्याचं इस्माइल फारुकी यांच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची मागणी केली होती.

9/11

9. राम मंदिरासाठी 6 डिसेंबर 1992 ला अयोध्या येथील बाबरी मशीद पाडण्यात आली होती. या प्रकरणावर अजूनही सुनावणी सुरु आहे.

10/11

10. इलाहाबाद हाय़कोर्टाने 30 सप्टेंबप 2010 ला अयोध्या वादात निर्णय दिला होता की, हा वादात असलेली जाग तिनही जणांना समान भागात वाटून द्यावी. पण यानंतर प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहोचलं. रामलला विराजमान आणि हिंदू महासभेने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती.

11/11

11. सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाने देखील सुप्रीम कोर्टात इलाहाबाद हाय़कोर्टाच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल केली होती. सुप्रीम कोर्टाने 9 मे 2011 ला या इलाहाबाद हायकोर्टाच्या आदेशावर रोख लावली होती. तेव्हा पासून हे प्रकरण सुप्रीम कोर्टात आहे.





Read More