Marathi News> उत्तर महाराष्ट्र
Advertisement

नाशिकमधील राजकारणी तुकाराम मुंढेंविरोधात एकटवले

या आखाड्यात नगरसेवक, आयुक्त, महौपार, आणि विरोधक मुंढेंविरोधात उभे ठाकले होते.

नाशिकमधील राजकारणी तुकाराम मुंढेंविरोधात एकटवले

नाशिक: नाशिक शहरात गुरूवारी राजकीय पक्षांनी अभूतपूर्व युती करत आयुक्त तुकाराम मुंढे यांना शह दिला. नगरसेवकच नव्हे तर आमदारही एकत्र झाले. त्यामुळे येत्या काळात मुंढे यांच्या नेतृत्वाखालील प्रशासन विरूद्ध राजकीय पदाधिकारी असा आखाडा रंगणार आहे. 

या आखाड्यात नगरसेवक, आयुक्त, महौपार, आणि विरोधक मुंढेंविरोधात उभे ठाकले होते. एरवी एकमेकांवर चिखलफेक कऱणारे सत्ताधारी आणि विरोधक एकत्र आले. त्यांचं सर्वांचं लक्ष्य होतं आयुक्त तुकाराम मुंढे. मनपाचा कारभार, विकासाची कामं, फक्त मुंढे यांच्या भोवताली एकवटल्यामुळे सर्वजण दुखावले आहेत. काहींनी त्यांना हिटलर म्हणायला सुरुवात केलेय. तर काहींनी 'तुका झालासे कळस' असे म्हणत टीका केलीय. पालकमंत्र्यांच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी उघडपणे आपला रोष व्यक्त केला होता.

Read More