Marathi News> मुंबई
Advertisement

'टाकाऊपासून टीकाऊ'चा वापर करत घरच्या घरी असे करा निसर्ग संवर्धन

 घरातील टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ, प्लास्टिक चा पुनर्वापर याबद्दल मार्गदर्शन 

'टाकाऊपासून टीकाऊ'चा वापर करत घरच्या घरी असे करा निसर्ग संवर्धन

प्रविण दाभोळकर, झी २४ तास, मुंबई : आज शहरात अनेकांच्या घरी वनस्पतींची वेगवेगळ्या फुल झाडे, औषधी तसेच शो प्लांटस आहेत. पण वेळेच्या अभावी किंवा जास्त माहिती नसल्याने त्यांचे संवर्धन योग्य पद्धतीने होत नाही. या आणि अशा अनेक विषयावर निसर्गमित्र धर्मेश बरई याने 'झी २४ तास' इंस्टाग्राम LIVE दरम्यान सर्वांना मार्गदर्शन केले. घरातील टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ, प्लास्टिक चा पुनर्वापर याबद्दलही धर्मशने इंस्टा LIVE मध्ये माहिती दिली. धर्मेश बरई हा 'एनवायरनमेंट लाइफ'चा संस्थापक आहेत. तसेच पर्यावरण प्रेमी आहेत. धबधबा स्वच्छता अभियान, रेल्वे लाईन स्वच्छता बरोबरच पर्यावरण संदर्भात विविध विषयांवर 'एनवायरनमेंट लाइफ'ची टीम काम करत आहेत.

आपलाला ऑक्सिजन स्वतः बनवण्याची गरज आहे. त्यासाठी विविध प्रकारच्या झाडांची लागवड आणि त्याची जोपासना करणे गरजेचं आहे. शहरात राहणारे खूपजण आपल्या घरात वेगवेगळी झाडे ठेवतात व त्याची काळजी हि घेतात पण बऱ्याच वेळा रोपांबद्दल अधिक माहिती नसल्याने रोप संवर्धनास कठीण जाते.  

रोपांमध्ये जास्त पाणी घालणे, कोणते झाड घरात म्हणजेच कमी सूर्यप्रकाशात ठेवायचे आणि कोणत्या झाडाला जास्त सूर्यप्रकाश लागतो ह्या बद्दल अधिक माहिती नसल्याने संवर्धनास कठीण जाते. काही फांद्यांवर अळी पाने खाताना दिसल्यास कीटक फवारणी करतात किंवा मारून टाकतात पण त्या अळीचे पुढे जाऊन सुरवंट व नंतर फुलपाखरु होते हे कित्येकांना माहित नसते.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#nature #naturephotography #naturelovers #freeplantmaintenance @pravin_dabholkr @dharmesh.barai

A post shared by ZEE 24 TAAS (@zee24taas) on

कधीकधी झाडांना बुरशी लागते आणि ते वेळेवर लक्ष न दिल्याने बऱ्याचदा रोप मरून जाते. अशा विविध गोष्टींबद्दल माहिती धर्मेशने इंस्टा LIVE च्या माध्यमातून दिली.

रोप लावायण्याआधी अभ्यास करून काही विशेष काळजी घेणे गरजेचे असते. ज्यामध्ये त्यासाठी रोपाची निवड हा महत्वाचा मुद्दा आहे. (इनडोर, ऑउटडोर, हँगिंग, वॉटर किंवा एअर प्लांट इत्यादी) करणे. रोप लावण्याची जागा निश्चित करणे, तिथे सूर्यप्रकाश आहे की नाही ? असेल तर किती वेळ सुर्यप्रकाश असतो ?, कुंडी आणि त्याचा खाली असलेल्या प्लेटची निवड देखील महत्वाची असते. जर तळमजला नसेल तर कुंडी खाली प्लेट असणे गरजेची असते. 

स्वयंपाक घरातून निघत असलेला कचऱ्याचे सेंद्रीय खत तयार करुन ते मातीसोबत एकत्र करून वापरता येऊ शकते. रोप लावताना मातीबरोबर थोडा पालापाचोळा वापरावा जेणेकरून मातीमध्ये रोपाचे मूळ व्यवस्थित पसरते. शक्य असल्यास माती किंवा सिमेंटच्या कुंडीचा वापर करणे, प्लास्टिक कुंडीचा वापर टाळावा असेही धर्मेशने सांगितले.

तुळस, जास्वंद, मोगरा, मनी वेल , पान वेल , कडीपत्ता, ओवा, सदाफुली, लिंबू, मिरची, कोरफड , पुदिना, गवती चहा, शोभेची रोपे , गुलाब, झेंडू, चिली गुलाब ही घरच्या कुंडीत सहज लावता येणारी रोपं आहेत.

fallbacks

कुंडीत रोप कसे लावावे ?

सर्वप्रथम कुंडी घ्या, कुंडीच्या खाली छोटे भोक आहे का तपासून घ्या ? नसेल तर करून घ्या, त्याचा नंतर माती घ्या त्यात जमलं तर थोडा सुकलेला पाला पाचोळा एकत्र करून अर्धी कुंडी भरून घ्या, जर नर्सरी मधून झाड आणलं असेल तर प्लास्टिक कव्हर काढा आणि झाड कुंडीत लावा शेवटी उरलेल्या जागेत माती भरून घ्या. नियमित पाणी टाकून सिंचन करा आणि योग्य जागेवर ठेवा.

हे लक्षात ठेवा 

झाड लावल्यानंतर झाडाची काळजी घेणे गरजेचं आहे, नियमित पाणी द्या. (झाडांना जास्ती पाणी टाकू नका), कुंडीत पाणी साचता काम नये तसेच कुंडी खाली असलेलया ताटलीत पाणी जमा होता कामा नये अन्यथा डास होण्याची शक्यता असते. जास्ती पाणी टाकल्याने झाडाचे मूळ सडून जाण्याची शक्यता जास्त असते , सूर्य प्रकाश आवश्यक झाडांना सूर्यप्रकाश व्यवस्थित मिळतो कि नाही त्याची काळजी घ्या, रासायनिक खात टाळावे, कांदाची साल जमा करून २४ तास पाण्यात भिजत ठेवा नंतर ते पाणी पाण्यात एकत्र करून झाडांना वापरलयास खूप शक्ती मिळेल, साधारण काही आठवडयांनी झाडाचे माती,मूळ सांभाळून सैल करा, फुलझाडाचे फुल तोडताना व्यवस्थित फांदी ना खेचता तोडा, कुंडयांच्या खाली ताटली ठेवा जेणेकरून पाणी आजू बाजूच्या भिंतीवर किंवा जमिनीवर पसरणार नाही.

झाडे आपल्याला निःशुल्क, काही अपेक्षा न ठेवता ऑक्सिजन देतात मात्र आपण ह्या रोपांच्या संगोपनास वेळ देणे गरजेचं आहेच त्याबरोबर काळाची गरज सुद्धा आहे, सर्वांनी थोडा फार आपला वेळ निसर्गाला देऊन निसर्गाचे संगोपन करायलाच पाहिजे, थोडं का होईना पृथ्वीवर ऑक्सिजन वाढण्यास नक्कीच मदत होईल.

Read More