Marathi News> मुंबई
Advertisement

'झी 24 तास'चा इम्पॅक्ट : याकूब मेमनच्या कबरीवरील एलईडी लाईट्स काढल्या

1993 Mumbai blasts accused Yakub Memon : ​आताची मोठी बातमी समोर येत आहे. मुंबई  बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमन (Yakub Memon) याच्या कबरीवरील एलईडी लाईट्स पोलिसांनी काढल्या आहे. 

'झी 24 तास'चा इम्पॅक्ट : याकूब मेमनच्या कबरीवरील एलईडी लाईट्स काढल्या

मुंबई : 1993 Mumbai blasts accused Yakub Memon : आताची मोठी बातमी समोर येत आहे. मुंबई  बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमन (Yakub Memon) याच्या कबरीवरील एलईडी लाईट्स पोलिसांनी काढल्या आहे. 'झी 24 तास'च्या बातमीनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई केली. अतिरेक्याच्या कबरीवरील एलईडी काढून टाकण्यात आल्या आहेत.

 बडा कब्रस्तानमध्ये मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली आहे. याकूब मेमनच्या कबरीवर करण्यात आलेल्या सजावटीबाबत एलटी मार्ग पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षकांकडून पाहणी करण्यात आली. 1993 च्या बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमनच्या कबरीवर मार्बल आणि LED लाईट्स लावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर आता कारवाईला सुरूवात करण्यात आली.

Yakub Memon : याकूब मेमनच्या कबरीला व्हीआयपी ट्रीटमेंट

कबरीला व्हीआयपी ट्रिटीमेंट देण्यात आली होती. 'झी 24 तास'ने ही बातमी दाखवताच मुंबई पोलिसांनी तातडीने कारवाई केली आहे. याकूब मेमनच्या कबरीवरील एलईडी लाईट्स काढून टाकण्यात आल्यायत. पण, यावरुन अनेक सवाल उपस्थित होत आहेत. मुंबईच्या शत्रूची कबर सजवलीच कुणी ? त्या ठिकाणच्या ओट्याला संगमरवरी फरशी कुणी बसवली? याकूबच्या कबरीला व्हीआयपी ट्रीटमेंट देणारा कोण? बडा कब्रस्तान ट्रस्टनं स्मशानभूमी विकली का? असे सवाल विचारले जात आहेत.

कोण होता याकूब मेमन?  

fallbacks

 - याकूब 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी
- मुंबई बॉम्बस्फोटात 257 निष्पाप लोकांचा मृत्यू
- स्फोटासाठी निधी गोळा केल्याचा याकूबवर आरोप
- याकूब मुख्य आरोपी टायगर मेमनचा मोठा भाऊ
- याकूब मेमन पेशानं चार्टर्ड अकाऊंट होता
- बॉम्बस्फोटात याकूबच्या कुटुंबातील 4 सदस्य सहभागी
- 2007 ला टाडा कोर्टानं सुनावली मृत्यूदंडाची शिक्षा
- 30 जुलै 2015 ला याकूब मेमनला फाशी 

Read More