Marathi News> मुंबई
Advertisement

येस बँकेवर निर्बंध, एटीएमबाहेर पैसे काढण्यासाठी गर्दी

येस बँकेवर (Yes Bank crisis)  रिझर्व्ह बँकेने (RBI) निर्बध लादल्यानंतर मुंबईतल्या विविध परिसरातील येस बँकेच्या एटीएमबाहेर गर्दी पाहायला मिळत आहे.  

येस बँकेवर निर्बंध, एटीएमबाहेर पैसे काढण्यासाठी गर्दी

मुंबई : येस बँकेवर (Yes Bank crisis)  रिझर्व्ह बँकेने (RBI) निर्बध लादल्यानंतर मुंबईतल्या विविध परिसरातील येस बँकेच्या एटीएमबाहेर गर्दी पाहायला मिळत आहे. रात्रीपासून येस बँकेच्या  (Yes Bank ) एटीएमबाहेर ग्राहकांनी गर्दी केली असून, पैसे काढण्यासाठी लांबचलांब रांग पाहायला मिळाली. दरम्यान आता लग्नसराई आणि सनासुदीचे दिवस सुरू आहेत. अशावेळी येस बँकेवर निर्बध घातल्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. 

भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) खासगी क्षेत्रातील येस बँकवर गुरुवारी निर्बंध लागू केले. त्यामुळे अनेक ग्राहकांना याचा फटका बसला आहे. केवळ ५०,००० रुपये काढता येणार असल्याने  बँकेच्या एटीएमबाहेर रात्रीपासूनच गर्दी होण्यास सुरुवात झाली आहे. अनेकांनी पैसे परत मिळतील का, याची भीती वाटू लागली आहे. दरम्यान, निर्बंध लादल्याची माहिती मिळताच ग्राहकांमध्ये घबराट निर्माण झाली असून काही ग्राहकांनी पैसे काढण्यासाठी मध्यरात्रीच एटीएममध्ये धाव घेतली.

दरम्यान, येस बँकेला भांडवल उभे करण्यात अपयश आल्याने, बँकेच्या प्रशासनाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाल्याने तसेच एकूण व्यवसायाची गुणवत्ता घसरल्याचे कारण देत हे निर्बंध लादल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. या निर्बंधांमुळे आता येस बँकेच्या खातेदारांना महिन्याला ५० हजार रुपयेच काढता येणार आहेत. हे निर्बंध तत्काळ लागू होत असल्याचे केंद्र सरकारने जाहीर केले. 

१२ फेब्रुवारी रोजी बँकेने शेअर बाजारांना सांगितल्यानुसार, बँक काही खासगी इक्विटी कंपन्यांकरवी भांडवल मिळवण्याचा प्रयत्न करत होती. परंतु, अखेर बँकेला भांडवल उभे करण्यात अपयश आल्याने आरबीआयने बँकिंग नियमन कायदा कलम ४५ अंतर्गत निर्बंध लागू केले, असे आरबीआयच्या पत्रकात म्हटले आहे. 

दरम्यान, आरबीआयने येस बँकेचे संचालक मंडळ ३० दिवसांसाठी बरखास्त केले आहे. आता भारतीय स्टेट बँकेचे निवृत्त मुख्य वित्त अधिकारी प्रशांत कुमार यांची येस बँकेचे प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आता येस बँकेवर प्रशासक असणार आहे.

Read More