Marathi News> मुंबई
Advertisement

यशवंत जाधव यांनी कंत्राटदाराला धमकी दिल्याचा आरोप, संभाषणाची ऑडिओ क्लिप जाहीर

महानगरपालिका (Mumbai Municipal Corporation) कंत्राटदाराला (Contractor) धमकी दिल्याच्या आरोपामुळं मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव (Yashwant Jadhav) वादात सापडलेत.  

यशवंत जाधव यांनी कंत्राटदाराला धमकी दिल्याचा आरोप, संभाषणाची ऑडिओ क्लिप जाहीर

मुंबई : महानगरपालिका (Mumbai Municipal Corporation) कंत्राटदाराला (Contractor) धमकी दिल्याच्या आरोपामुळं मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव (Yashwant Jadhav) वादात सापडलेत. मर्जीतला कंत्राटदार नेमण्यासाठी यशवंत जाधव यांनी आपणाला धमकावले, असा आरोप मेसर्स यश कॉर्पोरेशनचे कंत्राटदार रमेश सोळंकी (Contractor Ramesh Solanki) यांनी केला आहे. जाधव आणि सोळंकी यांच्यातल्या संभाषणाची ऑडिओ क्लिपच त्यांनी जाहीर केली आहे. 

ई वॉर्डातील २०९ बीटमधील ई निविदाअंतर्गत सर्वात कमी रकमेची निविदा भरूनही आपणाला काम दिलं जात नाही, असा सोळंकींचा आरोप आहे. आपल्या जीवाला काही धोका निर्माण झाल्यास यशवंत जाधव, मनस्वी तावडे आणि राकेश सागठिया या त्रिकुटाला जबाबदार धरावे, असंही त्यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, आपण कुणालाही धमकावलेले नाही, असा खुलासा यशवंत जाधव यांनी केला आहे. याबाबत वेळ आल्यावर सर्व काही सांगेन, असंही त्यांनी स्पष्ट केले आहे. तर शिवसेनेच्या नगरसेवकांनी महापालिका हे भ्रष्टाचाराचे कुरण बनवले. याप्रकरणी जनाची नाही तर मनाची लाज असेल, तर जाधव यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी मनसेने केली. भाजपने देखील याप्रकरणी जाधव यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

Read More