Marathi News> मुंबई
Advertisement

मुंबईतल्या रेल्वे रुळांवर यमराज

रूळ ओलांडणाऱ्या पकडतो यमराज

मुंबईतल्या रेल्वे रुळांवर यमराज

देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई : मुंबईत यमराज आलाय. मुंबईत रेल्वे रुळ ओलांडणाऱ्यांना रोखण्यासाठी चक्क यमराज आलाय. रेल्वे ओलांडताना दिसणाऱ्या प्रवाशाला थेट यमराज उचलून नेतो.

मुंबईत रेल्वे रुळ ओलांडताना दररोज अनेक प्रवाशांचा मृत्यू होतो. प्रवाशांनी रेल्वे रुळ ओलांडूच नये यासाठी रेल्वे प्रशासनाने अनेक उपाययोजना केल्या. रुळ ओलांडतानाचे अपघात कमी झाले पण ते पूर्णपणे बंद करण्यात रेल्वेला यश आलेलं नाही. त्यामुळे आता थेट रेल्वे रुळांवर यमराज उतरलेत. 

पश्चिम रेल्वेच्या माहीम, अंधेरी, गोरेगाव या स्टेशनवर चक्क यमराज तैनात केलेत. हा यमराज रेल्वे रुळ ओलांडणाऱ्याला थेट अडवतो. रेल्वे रुळ ओलांडणाऱ्या प्रवाशाच्या पाठीवर गदेचा प्रहारही करतो. एवढंच नव्हे तर तो प्रवाशाला उचलून थेट रेल्वे स्टेशनच्या फलाटावर येतो. 

  

रेल्वे पोलिसांच्या या जनजागृती मोहिमेचं कौतुक होत आहे. रेल्वे रुळ ओलांडणाऱ्यांची थेट मृत्यूशी गाठ आहे हे सांगण्यासाठी ही मोहीम अतिशय परिणामकारक होईल यात शंका नाही.

Read More