Marathi News> मुंबई
Advertisement

Women's Day : महिला पोलिसांना मोठे गिफ्ट, आता इतके तास ड्युटी

Women's Day : पोलीस दलात काम करणाऱ्या महिलांसाठी एक चांगली बातमी. जागतिक महिला दिनानिमित्त मुंबईचे पोलीस (Mumbai Police) आयुक्त संजय पांडे (Sanjay Pandey) यांनी पोलीस दलामधील महिला कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे.  

Women's Day : महिला पोलिसांना मोठे गिफ्ट, आता इतके तास ड्युटी

मुंबई : Women's Day : पोलीस दलात काम करणाऱ्या महिलांसाठी एक चांगली बातमी. जागतिक महिला दिनानिमित्त मुंबईचे पोलीस (Mumbai Police) आयुक्त संजय पांडे (Sanjay Pandey) यांनी पोलीस दलामधील महिला कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे. आजपासून (Women's Day) मुंबई पोलीस (police) दलामधील महिलांना आठ तासांची ड्युटी असणार आहे. (Mumbai women police will now be Eight hours duty)

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त मुंबई पोलिसांच्या महिला कर्मचाऱ्यांना मंगळवारपासून आठ तासांच्या शिफ्ट मिळतील, असे आयुक्त संजय पांडे यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी स्पष्ट केले की, महिलांना घर आणि कर्तव्य यामध्ये समतोल करता यावा या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. महिला (Women) दिनापासून पुढील आदेशापर्यंत महानगरात हे निर्देश लागू असणार आहे, असे अधिकार्‍यांनी यावेळी सांगितले. 

दरम्यान, संजय पांडे यांनी याआधी याबाबत घोषणा केली होती. आता याची अमलबजावणी आजपासून करण्यात येणार आहे. वर्षाच्या सुरुवातीला आठ तासांच्या ड्युटी शेड्यूलची सुरुवात केली होती. पोलीस आयुक्तांच्या दिलेल्या आदेशानुसार, महिला कर्मचार्‍यांसाठी दोन पर्याय आहेत. पहिल्या पर्याय, त्यांना सकाळी 8 ते 3, दुपारी 3 ते 10 आणि रात्री 10 ते सकाळी 8 अशा तीन शिफ्टमध्ये काम करावे लागणार आहे. दुसऱ्या पर्यायामध्ये सकाळी 7 ते दुपारी 3, दुपारी 3 ते 11 आणि रात्री 11 ते सकाळी 7 अशा शिफ्टच्या वेळा असणार आहेत.

देशाच्या आर्थिक राजधानीच्या सुरक्षेसाठी कार्यरत असलेल्या मुंबई पोलिसांवर कायमच कामाचा ताण असतो. 12 तासांची ड्युटी कागदोपत्री असली तरी हीच ड्युटी कधी-कधी 16 ते 24 तासांपर्यंत होत असे. याचा परिणाम पोलिसांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासोबतच कौटुंबिक आयुष्यावर होत होता. त्यामुळे अन्य आस्थापनांप्रमाणेच मुंबई पोलिसांच्या ड्युट्या आठ तास करण्याच्या उपक्रमाचा प्रस्ताव देवनार पोलीस ठाण्यातील रवींद्र पाटील यांनी तत्कालीन पोलीस आयुक्त दत्ता पडसळगीकर यांच्या समोर मांडला होता. आता त्याला मूर्तस्वरुप मिळाले आहे.

Read More