Marathi News> मुंबई
Advertisement

मुंबईत लॉकडाऊनचे निर्बंध आणखी शिथिल होणार? कोरोना रुग्णांमध्ये घट झाल्याने प्रशासनाचे संकेत

 मुंबईतील आरोग्य यंत्रणेनेही कोरोनाच्या लाटेला रोखण्यासाठी सर्व प्रयत्न केले. त्याचा परिणाम म्हणून मुंबईतील कोरोना परिस्थितीत  बऱ्यापैकी आटोक्यात आली आहे.

मुंबईत लॉकडाऊनचे निर्बंध आणखी शिथिल होणार? कोरोना रुग्णांमध्ये घट झाल्याने प्रशासनाचे संकेत

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे मुंबईकरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. पहिल्या लाटेपेक्षा  अधिक वेगाने पसरलेल्या या कोरोनाच्या लाटेने अनेक रुग्णांचे बळी घेतले. मुंबईतील आरोग्य यंत्रणेनेही कोरोनाच्या लाटेला रोखण्यासाठी सर्व प्रयत्न केले. त्याचा परिणाम म्हणून मुंबईतील कोरोना परिस्थितीत  बऱ्यापैकी आटोक्यात आली आहे. 

गेल्या काही दिवसात मुंबईचा पॉझिटिव्हिटीचा रेट घसरला आहे. गेल्या आठवड्यात मुंबईचा पॉझिटिव्हिटी दर 3.79 टक्क्यांवर आला आहे. त्याआधीच्या आठवड्यात हाच दर 4.40 टक्के इतका होता. 

त्यामुळे मुंबईतील लॉकडाऊनचे निर्बंध आणखी शिथिल होण्याची शक्यता आ्हे. राज्य सरकारच्या ब्रेक द चेन अंतर्गत अनलॉकच्या प्रक्रियेत मुंबईचा सामावेश आता पहिल्या स्तरात करण्यात आला आहे.

त्यामुळे येत्या काही दिवसात मुंबईतील लॉकडाऊनचे निर्बंध आणखी शिथिल होतात का याकडे मुंबईकरांचे लक्ष लागून आहे.

Read More