Marathi News> मुंबई
Advertisement

Sanjay Raut : संजय राऊत यांच्या ईडी कारवाईमागे भाजपचे 'ते' दोन नेते कोण?

'ठाकरे सरकार पाडण्यासाठी जर मदत केली नाही तर... दिली होती धमकी'

Sanjay Raut : संजय राऊत यांच्या ईडी कारवाईमागे भाजपचे 'ते' दोन नेते कोण?

ED Detian Sanjay Raut : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना ईडीने (ED) ताब्यात घेतलं असून त्यांनी ईडी कार्यालयात आणण्यात आलं आहे. 

संजय राऊत यांना त्यांच्या भांडूपमधल्या घरातून ईडीने ताब्यात घेतलं. त्यानंतर त्यांना फोर्ट इथल्या ईडी कार्यालयात आणण्यात आणलं. यावेळी प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी मोठा खुलासा केला आहे.  या कारवाईमागे भाजपचे (BJP) दोन नेते आहेत असा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केला आहे. 

भाजपसोबत सरकार बनवलं नाही या प्रश्नावर उत्तर देताना संजय राऊत यांनी मोठा खुलासा केला आहे. यासंबंधी सहा महिन्यांपूर्वी राज्यसभा अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहून त्यांना पूर्ण माहिती दिली होती. माझ्यावर कसा दबाव आणला जात आहे, ठाकरे सरकार पाडण्यासाठी जर मदत केली नाही तर जेलमध्ये टाकलं जाईल, अशी मला धमकी देण्यात आली होती. भाजपचे दोन नेते यामागे आहेत, तुमच्यावर ईडी कारवाई केली जाईल असं त्यांनी म्हटलं होतं, असा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केला आहे. 

शिवसेनेला त्रास देण्यासाठी, महाराष्ट्राला कमजोर करण्यासाठी, हे सर्व दमनचक्र सुरु आहे. पण मी बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक आहे असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. 

आम्ही लढणार, आम्ही लढू, महाराष्ट्र इतका कमजोर नाही, शिवसेना इतकी कमजोर नाही, शिवसैनिक इतके कमजोर नाहीत. महाराष्ट्राला संपवण्याचा हा डाव असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. 

https://zeenews.india.com/marathi/video/ed-detains-sanjay-raut-over-patra-chawl-land-scam-case-raut-say-jhukega-nahi/640852

खोटे कागद, पुरावे तयार केले जात आहेत, पण संजय राऊत झुकणार नाही आणि शिवसेना सोडणार नाही. महाराष्ट्र कमजोर होतोय, पेढे वाटा असा टोलाही संजय राऊत यांनी विरोधकांना लगावला आहे. 

महाराष्ट्र झुकणार नाही, लढत राहिल,  संजय राऊत यांची चूक एकच आहे ते शिवसेनेसोबत आणि महाराष्ट्रासोबत इमानदार राहिले, आणि जन्मभर राहणार, मला फाशी दिली तरी चालेल, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. 

Read More