Marathi News> मुंबई
Advertisement

काश्मिर पंडितांची घरवापसी कधी होणार? संजय राऊत यांचा भाजपाला सवाल

काश्मिर फाईल्स सिनेमात सत्य लपवण्यात आलं आहे, संजय राऊत यांचा आरोप  

काश्मिर पंडितांची घरवापसी कधी होणार? संजय राऊत यांचा भाजपाला सवाल

मुंबई : काश्मिर पंडीतांची (Kashmir Pandit) घरवापसी कधी होणार, जी आश्वासनं देऊन  तुम्ही मतं घेतली. ती वापसी कधी होणार, काश्मीरमधल्या युवकांची बेरोजगारी कधी संपवणार आहात. आणि काश्मिरमध्य सर्वात मोठी गुंतवणूक करण्याचं जे आपण वचन दिलं होतं, बेरोजगारी हटवण्यासाठी ते आपण कधी करणार आहात असे सवाल शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपाल विचारले आहेत.

काश्मिरमध्ये गेल्या काही वर्षात काय झालंय हे आम्ही खूप जवळून बघितलं आहे. यावर सिनेमा बनवला गेला आणि त्याचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न आहे. पण सिनेमात सत्य लपवण्यात आलं आहे असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. 

खूप गोष्टी आहेत ज्या काश्मिर फाईल्स (Kashmir Files) या सिनेमात दाखवण्यात आल्या नाहीत. काश्मिर घटनेवर सिनेमा आला आहे आणि भाजपा त्याचा प्रचार करत आहे. स्वत: पंतप्रधान प्रचार करत आहेत. त्यामुळे भाजपचे समर्थक तो चित्रपट पहाणारच असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.

आम्ही पाकव्याप्त काश्मिर हिंदुस्तानमध्ये आणू आणि अखंड हिंदुस्तानचं स्वप्न पूर्ण करु, तो पाकव्यक्त काश्मिर हिंदुस्तानला कधी जोडताय,  म्हणजे वीर सावरकरांचं जे स्वप्न होतं, ते आम्हाला या जन्मात पाहता येईल, असं उपरोधिक टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. 

काश्मिर हा आपल्या देशासाठी संवेदनशील विषय आहे, यावरुन अनेक वर्ष राजकारण सुरु आहे, आम्हाला वाटलं नरेंद्र मोदी आल्यावर ते थांबेल पण वाढतच चाललं आहे. 

काश्मिर पंडितांसोबत शिखांनीही बलिदान दिलं आहे. सुरक्षा दलातील मुस्लिम पोलिसांना देखील अतिरेक्य़ांनी मारलं आहे, काश्मिर पंडित स्वत: सांगतात की त्यांचे प्राण वाचवायला अनेकवेळा मुस्लिम अधिकारी आले होते, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. 

शिवसेना कधीही हिंदुत्व विसरणार नाही
शिवसेना कधीही हिंदुत्व विसरणार नाही आणि विसरलेली नाही, हिंदुत्व कोण विसरले याचे आत्मचिंतन भारतीय जनता पक्षाने करावे, हिंदुत्ववादी शिवसेनेला दगा कोणी दिला त्याचे चिंतन त्यांनीच केले पाहिजे, आम्ही आमच्या हिंदुत्वाशी पक्के आहोत आणि जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा तेव्हा हिंदुत्वासाठी हातात तलवार घ्यायला आम्ही तयार आहोत असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Read More