Marathi News> मुंबई
Advertisement

'व्हेल' माशाच्या उलटीसाठी पावणे दोन कोटी... दोघांना अटक

या दगडाचा वापर ल्युब्रिकेंट तयार करण्यासाठी केला जातो शिवाय त्यापासून उच्चप्रतिचं अत्तरही तयार होतं

'व्हेल' माशाच्या उलटीसाठी पावणे दोन कोटी... दोघांना अटक

अमोल पेडणेकर, झी २४ तास, मुंबई : व्हेल मासा उलटी करतो हे तुम्हाला माहिती आहे का? हो व्हेल मासा उलटी करतो. आता तुम्ही म्हणाल उलटीला एवढं महत्त्व काय आहे. उलटीला महत्व आहे, पण ती उलटी व्हेल माशानं केली असेल तर.... व्हेल माशाच्या उलटीच्या दगडाची किंमत कोट्यवधीच्या घरात आहे.

खोल समुद्रात राहणारा व्हेल मासा कुणाला माहिती नाही. हा मासा तर अमूल्य आहेच. पण या माशानं केलेल्या उलटीपासून तयार झालेला दगडही अमूल्य असतो. व्हेल मासा समुद्रात उलटी करतो. त्याच्या उलटीचा पाण्यावर तवंग तयार होतो. हा तवंग घनरूप होऊन दगडासारखा पदार्थ तयार होतो. या दगडाचा वापर ल्युब्रिकेंट तयार करण्यासाठी केला जातो. शिवाय त्यापासून उच्चप्रतिचं अत्तरही तयार होतं.

fallbacks

याच उलटीचा दगड विकण्यासाठी दोन जण मुंबईत येणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीवरुन पोलिसांनी दोघांना अटक केली, अशी माहिती पोलीस उपायुक्त अखिलेश सिंह यांनी दिलीय. पावणे दोन कोटींचा उलटीचा दगड पाहून पोलीसही चक्रावलेत.

व्हेल मासा हा जगातला सर्वात मोठा सस्तन जलचर आहे. हा मासा दुर्मिळ होत चाललाय. दुर्मिळ होत चाललेला हा मासा जेवढा अमूल्य आहे तेवढी त्याची उलटीही अमूल्य आहे.

Read More