Marathi News> मुंबई
Advertisement

सागरी सुरक्षा शिकण्यासाठी बेवॉच पाहा; न्यायालयाचा टोला

सुरक्षित समुद्र किनाऱ्या बाबत जनहित मंचाकडून दाखल याचिकेवर न्यायमूर्ती खेमकरन आणि एस व्ही कोतवाल यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे

सागरी सुरक्षा शिकण्यासाठी बेवॉच पाहा; न्यायालयाचा टोला

मुंबई: राज्यातील समुद्र किनाऱ्यांची सुरक्षा कशी करायची हे बेवॉचकडून मालिकेकडून शिका, असा टोला मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला लगावला आहे. राज्यातील समुद्र किनारे सुरक्षित असल्याचा दावा सरकारने केला असला तरी जुन पर्यंत ४९ जणांचा बुडून म्रूत्य झाला आहे. यावेळी किनाऱ्यावरील सुरक्षेवर चिंता व्यक्त करत आगामी गणेशोत्वात समुद्र किनारे सुरक्षित करण्यासाठी योग्य त्या उपायोजना करण्यास सरकारने सांगितले आहे. 

गणेशोत्सवापूर्वी समुद्र किनारे सुरक्षित करा

सुरक्षित समुद्र किनाऱ्या बाबत जनहित मंचाकडून दाखल याचिकेवर न्यायमूर्ती खेमकरन आणि एस व्ही कोतवाल यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे. २०१६ साली मुरूड जंजीरा १४ कॉलेज विद्यार्थी वाहून गेल्या नंतर ही याचिका करण्यात आली होती. गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी समुद्र किनारी लोटणारा जनसागर लक्षात घेता सरकारने स्थानिक संस्थांशी संपर्क साधून गणोशोत्सवापूर्वी समुद्र किनारे  सुरक्षित करण्याचे सर्व उपाययोजना करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.

'तुम्ही बेवॉच कधी बघता का'

बृह्नमुंबई प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीकोनातून मुंबईतील किनाऱ्यांवर ९० जीवरक्षक आणि पेट्रोलिंग जीप नेमल्याची माहिती कोर्टाला दिली. यावेळी ही जिप  एका जागी ऊभी न ठेवता सतत पेट्रोलींग करण्यास कोर्टाने सांगितलं. यावेळी अत्याधुनिक रहाण्याचा सल्ला देत तुम्ही बेवॉच कधी बघता का असा सवाल देखील कोर्टाने विचारला.

Read More