Marathi News> मुंबई
Advertisement

लोखंडी पिंजऱ्यातून एंट्री घेताना तार तुटली अन्... मुंबईच्या व्यावसायिकाचा हैदराबादमध्ये मृत्यू

Vistex Asia CEO Sanjay Shah :

लोखंडी पिंजऱ्यातून एंट्री घेताना तार तुटली अन्... मुंबईच्या व्यावसायिकाचा हैदराबादमध्ये मृत्यू

Vistex Asia CEO Sanjay Shah : रामोजी फिल्म सिटीमध्ये एका कॉर्पोरेट कार्यक्रमादरम्यान लोखंडी पिंजरा कोसळल्याने अमेरिका स्थित बहुराष्ट्रीय सॉफ्टवेअर कंपनीचे संस्थापक संजय शहा यांचा मृत्यू झाला. तर कंपनीचे अध्यक्ष गंभीर जखमी झाले. व्हिसटेक्स आशिया-पॅसिफिक प्रायव्हेट लिमिटेडच्या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमादरम्यान हा अपघात झाला. या अपघातामध्ये अमेरिकेतील सीईओ आणि मुळचे भारतीय नागरिक असलेल्या संजय शहा यांचा हैदराबाद येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर कंपनीचे चेअरमन विश्वनाथ राजू दतला यांच्यावर उपचार सुरु आहेत.

वास्तविक, व्हिसटेक्सने रामोजी फिल्म सिटीमध्ये आपल्या कर्मचाऱ्यांसाठी खोल्या बुक केल्या होत्या आणि दोन दिवसीय रौप्यमहोत्सवी कार्यक्रम आयोजित केला होता. कंपनीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, शाह आणि राजू यांना पिंजऱ्यातून लोखंडी स्टेजवर उतरवणे हा कार्यक्रम सुरू करण्यासाठी नियोजित कार्यक्रम होता. लोखंडी पिंजऱ्यात शाह आणि राजू यांना उंचावरून स्टेजवर आणले जात असताना सायंकाळी 7.40 वाजता हा अपघात झाला. या अपघातात संजय शहा यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघाताच्या वेळी संगीत वाजत होते आणि शाह आणि राजू खाली उतरत असताना ते कर्मचाऱ्यांना पाहून हात हलवत होते. पिंजरा हळूहळू खाली येत असताना पिंजऱ्याला जोडलेल्या दोन तारांपैकी एक तार तुटली. यामुळे दोघेही 15 फुटांपेक्षा जास्त उंचीवरून खाली पडून काँक्रीटच्या प्लॅटफॉर्मवर पडले. त्यामुळे दोघांनाही जबरदस्त दुखापत झाली होती. दोघांनाही तात्काळ उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र संजय शहा यांचा मृत्यू झाला. तर विश्वनाथ राजू  यांच्यावर उपचार सुरु आहेत.

दोघांनाही स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले आणि नंतर त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, असे पोलिसांनी सांगितले. मात्र काही वेळाने शहा यांचे निधन झाले. कंपनीच्या अन्य अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून फिल्मसिटी कार्यक्रम व्यवस्थापन अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आयपीसी कलम 304 अ आणि 336 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांमध्ये आरएफसी व्यवस्थापन, त्याचे वरिष्ठ इव्हेंट मॅनेजर, मुख्य व्यवस्थापक (सुरक्षा), स्पेशल इफेक्ट्स कॉन्ट्रॅक्टर्स आणि रोप ऑपरेटर यांचा समावेश आहे.

कोण आहेत संजय शहा?

मुंबईच्या संजय शहा यांनी 1999 साली या कंपनीची स्थापना केली होती. कंपनी महसूल व्यवस्थापनाशी संबंधित यंत्रणा तयार करण्याचे काम व्हिसटेक्स करत होती. कंपनीकडे 1,600 कर्मचारी असून वार्षिक 300 दशलक्ष अमेरिकी डॉलर्सची उलाढाल कंपनीने केली आहे. कोका कोला, जीई, डेल, सिमन्स, ॲडॉब, केलॉग्स, ॲबॉट, बेयर, यामाहा, सोनी, एनव्हिडिया, एचपी, सिस्को अशा नामांकित कंपन्या व्हिसटेक्सच्या अशील आहेत.

Read More