Marathi News> मुंबई
Advertisement

ऑडी चहावाला! मुंबईच्या रस्त्यावर रात्री ते दोघे ऑडी कारमधून चहा विकतात, सोशल मीडियावर एकच चर्चा

Viral Video : सध्या सोशल मीडियावर मुंबईतील दोन तरुणींची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. मुंबईतील पॉश परिसर लोखंडवालामधील रस्त्यावर दे दोघे ऑडीमधून उरतात आणि चहाची टपरी लावतात. 

ऑडी चहावाला! मुंबईच्या रस्त्यावर रात्री ते दोघे ऑडी कारमधून चहा विकतात, सोशल मीडियावर एकच चर्चा

Audi Chaiwala Viral Video : दिवसेंदिवस उष्णता वाढत असतानाही चहा प्रेमींचे चहावरील प्रेम काही कमी होताना दिसत नाही आहे. मुंबईकर आणि चहा यांचं एक अतूट नातं आहे. दिवस असो वा रात्र चहा शौकीन कितीही वेळा चहाचा आस्वाद घेऊ शकतात. मुंबईच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जा तुम्हाला चहा टपरी किंवा सायलवर चहा विकणारा नक्की दिसेल. एक वेळ खायला काही मिळणार नाही. पण मुंबईत चहा कुठल्याही वेळेत अगदी रात्री दोन वाजता पण मिळेल. 

गेल्या काही दिवसांपासून आपण सोशल मीडियावर इंजिनियर तरुणीची मिसळ पावचा ठेल्यापासून कांदेपोहे विकणारे शिक्षित तरुण तरुणी पाहिले आहेत. मुंबईत वेगवेगळ्या ब्रँण्डचे चहाचे असंख्य दुकान टपरी दिसतात. येवले चहा, अमृततुल्य, आमदार गूळाचा चहा अशी संख्य दुकाने आहेत. त्यात एमबीए चायवाला, ग्रॅज्युएट चायवाला असे नवीन ट्रेंड आले. त्यात आता अजून एका ट्रेंडची चर्चा रंगली आहे. ऑडी चायवाला...ऐकलं किंवा बघितलं आहेत का तुम्ही?

मुंबईच्या रस्त्यावर त्या चौकात रात्री अनेक चहा विक्रेतेच्या बाजूनला दोन तरुण ऑडी घेऊन येतात. ऑडीतून उतरतात आणि चहा द्याच्या ऐवजी चहा विकायला सुरुवात करतात. हे दोघे तरुण सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. सोशल मीडियावरही त्यांचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. मुंबईतील महागड्या आणि पॉश असा एरिया लोखंडवालामध्ये तुम्ही रात्रीच्या वेळी गेल्यास तुम्हाला हे दोघे दिसतील. ते दोघे एक चहा 20 रुपयात विकतात. (viral video mumbai chaiwala tea stall in his audi Trending Video Audi Chaiwala on instagram)

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील इंस्टाग्राम अकाऊंटवरील 'सच कडवा है' यावर 'ऑन ड्राइव्ह चहा'च्या प्रसिद्ध स्टॉलबद्दल पोस्ट शेअर करण्यात आली आहे.इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र फक्त या दोन तरुणांची चर्चा होते आहे.

ळालेल्या माहितीनुसार, हा स्टॉल अमित कश्यप आणि मन्नू शर्मा  असं या दोघांचं नाव आहे. या दोघांच्या व्हिडीओवर एका यूजर्सने मजेदार कंमेट केली आहे. तो म्हणतो की, चहा विकून ऑडी विकत घेतली आहे की ऑडी विकत घेतल्यामुळे चहा विकण्याची वेळ आली. एका म्हटलं आहे की, ऑडीमध्ये पेट्रोल भरण्यासाठी पैसे कमाई करावी लागत आहे वाटत.

त्या दोघांवर ही वेळ का आली त्याबद्दल अद्याप काही समजलं नाही. 

 

Read More