Marathi News> मुंबई
Advertisement

चिमुकल्याने कबड्डीमध्ये असं केलं त्याच्या पेक्षा मोठ्या मुलाला चित, VIDEO व्हायरल

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा चिमुकल्याचा कबड्डी व्हिडिओ आतापर्यंत अनेक लोकांना शेअर केला आहे.

चिमुकल्याने कबड्डीमध्ये असं केलं त्याच्या पेक्षा मोठ्या मुलाला चित, VIDEO व्हायरल

मुंबई : इच्छाशक्ती जर मजबूत असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही असं म्हटलं जातं. याची अनेक उदाहरणं जगाने पाहिली आहेत. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल (Viral video) होतोय. या व्हिडिओमध्ये एक चिमुकला आपल्या पेक्षा मोठ्या मुलाला चित करताना दिसत आहे. कबड्डी (Kabaddi) खेळत असतानाचा हा चिमुकल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.(Small kabaddi player)

सोशल मीडियावर (Trending Video) असे काही खास व्हिडिओ नेहमीच व्हायरल होत असतात. व्हिडिओमध्ये दिसणारा चिमुकला कबड्डी (Kabaddi Video) खेळत असताना समोरच्या प्रतिस्पर्धीवर तुटून पडण्यासाठी तो इतका तयार दिसतोय. ज्यामध्ये त्याची खेळाडू कौशल्य दिसत आहे. समोरच्या टीममधला खेळाडू एन्ट्री मारताच चिमुकला योग्य क्षणी त्याचा पाय धरतो. त्यानंतर इतर खेळाडू येऊन त्याला साथ देतात.

या चिमुकल्याचं हे कौशल्य पाहून अनेक जण त्याचं कौतूक करत आहेत. तर काही जण त्याचा हा खेळ पाहून आश्चर्यचकीत झाले आहेत.

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला ही नक्कीच त्या मुलाचं कौतूक वाटत असेल. तर यावर तुमची प्रतिक्रिया नक्की द्या.

Read More