Marathi News> मुंबई
Advertisement

काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते आज कुठे आहेत? विनोद तावडेंचा सवाल

काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते आज कुठे आहेत? विनोद तावडेंचा सवाल

काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते आज कुठे आहेत? विनोद तावडेंचा सवाल

मुंबई : माजी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडेंना वादग्रस्त डिग्रीबाबत लावलेला न्याय उदय सामंतांना लावला जाईल का? असा प्रश्न आता उपस्थित झालाय. विनोद तावडेंप्रमाणेच आता नव्या सरकारमधले तंत्र आणि उच्चशिक्षण मंत्री उदय सामंत यांची डिग्रीही मान्यता नसलेल्या पुण्याच्या ज्ञानेश्वर विद्यापीठाचीच आहे. 

तर यावर बोलताना विनोद तावडे म्हणाले आहेत, माझ्यावर टीका करणारे काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते आज कुठे आहेत? असा सवाल माजी शिक्षण मंत्री विनोद तावडेंनी केला आहे. भाजप सरकारच्या काळातले उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांच्या ज्ञानेश्वर विद्यापीठातून घेतलेल्या डिग्रीचा वाद अगदी आता आत्तापर्यंत सुरू होता. 

विशेष म्हणजे, यावेळी विद्यापीठही तेच आहे, वादही तोच आहे, खातंही तेच आहे, फक्त सरकार आणि संबंधित मंत्री बदलले आहेत. दरम्यान, विनोद तावडेंवर टीका करणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी याबाबत बोलण्यास नकार दिला आहे. या विद्यापीठाबाबत एकदाच तज्ज्ञांकडून निर्णय घ्यावा, असा सल्ला शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांनी दिला आहे. 

Read More