Marathi News> मुंबई
Advertisement

वाशीच्या नवीन खाडी पुलाच्या दुरुस्ती कामाला सुरुवात

मुंबईकरांचा रविवार धीमा असणार असणार आहे.

वाशीच्या नवीन खाडी पुलाच्या दुरुस्ती कामाला सुरुवात

मुंबई : मुंबईकरांचा रविवार धीमा असणार असणार आहे.

मध्य रेल्वेवर करी रोड, परळ पुलाच्या कामासाठी जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे दादर ते सीएसएमटी वाहतूक जवळपास 8 तास बंद राहणार आहे. त्यामुळे मुंबईकरांनी मध्य रेल्वेने प्रवास टाळण्याचं आवाहन करण्यात आलंय. दुसरीकडे मुंबई विमानतळाची धावपट्टी सात तास बंद ठेवण्यात येणार आहे. तर वाशीच्या नवीन खाडी पुलाच्या दुरुस्ती कामाला सुरुवात झालीय. 

नवी मुंबई ते मुंबईला जोडणा-या वाशी इथल्या नवीन ठाणे खाडी पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरु झालंय. या कामाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत बदल करण्यात आलाय. मुंबईहून वाशीकडे आणि वाशीहून मुंबईकडे येणा-या वाहतुकीत बदल करण्यात आलेत.
वाशीकडून मुंबईकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने नवीन खाडी पुलावरील उत्तर मार्गिकेवरून म्हणजेच मुंबई - पनवेल मार्गिकेने सोडण्यात येतायत.

तर मुंबईहून वाशीकडे जाणारी हलकी वाहने जुन्या खाडी पुलावरून आणि जड वाहने ऐरोलीमार्गे सोडण्यात येतायत. 21 फेब्रुवारी या कालावधीत वाहतूक इतर मार्गावरुन वळवण्यात आलीय. 

Read More