Marathi News> मुंबई
Advertisement

वर्षा राऊत यांची PMC प्रकरणात ईडी चौकशी सुरू

वर्षा राऊत ईडी कार्यालयात हजर

वर्षा राऊत यांची PMC प्रकरणात ईडी चौकशी सुरू

मुंबई : शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने समन्स बजावले होते. पीएमसी बँक गैरव्यवहार प्रकरणी चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश ईडीने दिले होते. त्यावर वर्षा राऊत यांनी ईडीकडे वेळ वाढवून मागितला होता. 

५ जानेवारी रोजी वर्षा राऊत चौकशीसाठी जाणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र, आजच ईडी कार्यालयात हजर होत वर्षा राऊत यांनी सगळ्यांना धक्का दिला आहे. 

एकीकडे शिवसेना ईडीविरोधात रस्त्यावर उतरणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. ५ जानेवारीला ईडी विरोधात शिवसैनिकांचं आंदोलनाची चर्चा होती. पण आजच वर्षा राऊत या चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल झाल्या आहेत. त्यातच दक्षिण मुंबईतील शिवसैनिकांना जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहे. यावेळी ईडी कार्यालयाबाहेर शिवसैनिकांची घोषणाबाजी केली.

 

Read More