Marathi News> मुंबई
Advertisement

धक्कादायक! नशेसाठी कफ सिरपचा वापर; औषधांच्या बाटल्या जप्त करत NCB कडून दोघांना बेड्या

NCB मुंबईने एक बोलेरो आणि दुचाकीसह दोन व्यक्तींना अटक केलीये.

धक्कादायक! नशेसाठी कफ सिरपचा वापर; औषधांच्या बाटल्या जप्त करत NCB कडून दोघांना बेड्या

मेघा कुचिक, मुंबई : मुंबईच्या नार्कोटीक्स कंट्रोल ब्युरो विभागाने पुन्हा एकदा धडक कामगिरी केली आहे. नार्कोटीक्स कंट्रोल ब्युरो अर्थातच NCB मुंबईने भिवंडी इथल्या 864 किलो कफ सिरपच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. 8640 इतक्या या बाटल्यांची संख्या आहे. या कफ सिरपचा वापर ड्रग्ज सारख्या नशेसाठी केला जातो. यावेळी NCB मुंबईने एक बोलेरो आणि दुचाकीसह दोन व्यक्तींना अटक केलीये.

कशी पकडले ड्रग्ज?

अशा प्रकारे कफ सिरपचा वापर नशेसाठी केला जात असून आग्रा- मुंबई महामार्गावरून त्याची वाहतूक केली जाणार असल्याची माहिती NCB मुंबईला त्यांच्या सूत्रांकडून मिळाली होती. मुंबई NCB च्या एका पथकाने भिवंडीजवळ आग्रा-मुंबई महामार्गावर पाळत ठेवली आणि एक बोलेरो पिकअप अडवली. 

गाडीची झडती घेतली असता वाहनातील 60 बॉक्समध्ये एकूण 864 किलो कोडीन आधारित कफ सिरप पद्धतशीरपणे भरलेलं आढळले. वाहनचालकाची चौकशी केली असता ही औषध नशा करण्यासाठी पुरवली जाणार असल्याची माहिती समोर आली. 

ही गाडी अडवल्यानंतर दोन तासांनंतर औषधं घेऊन जाण्यासाठी येणाऱ्या गाडीला पकडण्यासाठी मुंबई NCB ने सापळा रचला. NCB पथकाने सुमारे 2 किलोमीटर पायी पाठलाग करत औषधं घेण्यासाठी आलेल्या गाडीला पकडलं. ही औषधे मुंबई आणि ठाण्यातील विविध भागांमध्ये मादक पदार्थ म्हणून पुरवले जाणार होते. डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय ही औषध नशा करण्यासाठी वापरली जाणार होती. 

Read More