Marathi News> मुंबई
Advertisement

अनलॉक १.० : राज्यात खासगी आणि सरकारी कार्यालय सुरु करण्यासाठी 'हे' नियम

राज्य सरकारने लॉकडाऊनबाबत नियमावली जाहीर केली आहे.

अनलॉक १.० : राज्यात खासगी आणि सरकारी कार्यालय सुरु करण्यासाठी 'हे' नियम

मुंबई : राज्य सरकारने लॉकडाऊन ५.० मध्ये टप्प्या-टप्प्याने शिथिलता देण्यास सुरुवात केली आहे. राज्य सरकारने लॉकडाऊनबाबत नियमावली जाहीर केली आहे. या नियमावलीमध्ये खासगी आणि सरकारी कार्यालयांबाबतही नियम जारी केले आहेत. ३ जूनपासून सरकारी कार्यालयांमध्ये १५ टक्के उपस्थितीस परवानगी देण्यात आली आहे. आधी ही उपस्थिती ५ टक्के इतकी होती.

तर, ८ जूनपासून सर्व खासगी कार्यालये १० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत चालविण्यास परवानगी देण्यात आली आहे. उरलेल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचा पर्याय देण्याचं सांगण्यात आलं आहे. कामाच्या ठिकाणी सर्व खबरदारी घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

असा असणार राज्यातला लॉकडाऊन ५.०

सरकारी आणि खासगी कार्यालयांमध्ये काम करताना काही अटी-नियमांचं पालन करणं आवश्यक असणार आहे. आरोग्य विभागाकडून याबाबत नियम जारी करण्यात आले आहेत. 

- थर्मल-इंफ्रारेड थर्मामीटरने कार्यालयात येणाऱ्या कर्मचारी-अधिकाऱ्यांचं स्क्रिनिंग करणं अनिवार्य असणार आहे.
- खेळत्या हवेसाठी ऑफिसचे दरवाजे-खिडक्या खुल्या ठेवावेत.
- सर्व कर्मचाऱ्यांना मास्क घालणं आवश्यक 
- तोंड, नाकाला सतत हात लावणं टाळणं
- खोकला-शिंक आल्यास रुमाल, टिशूचा वापर करणं
- ऑफिसमध्ये दोन कर्मचाऱ्यांमध्ये कमीत-कमी तीन फूटांचं अंतर ठेवणं अनिवार्य
- ऑफिसच्या प्रवेशद्वारावर सॅनिटायझर असणं गरजेचं
- प्रसाधनगृहात साबण, हँडवॉश असणं आवश्यक
- लिफ्ट, बेल, बटण, टेबल, खूर्च्या आणि इतर उपकरणं दिवसांतून तीन वेळा 2 टक्के सोडियम हायपोक्लोराईटने स्वच्छ करणं
- अल्कोहलमिश्रित सॅनिटायझरसह कंम्प्यूटर, स्कॅनर, प्रिंटर दिवसांतून दोन वेळा साफ करणं
- अनेक लोक ऑफिसच्या एकाच वाहनातून प्रवास करु शकत नाही
- मिटिंग व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घ्यावी, मिटिंगसाठी एकत्र जमू नये
- ऑफिसमध्ये एकत्र जमा होऊ नये, जेवणासाठी एकत्र बसू नये

राज्यात लॉकडाऊनमध्ये शिथिलता, पण या गोष्टी बंदच राहणार

 

एखादा व्यक्ती कोरोना संक्रमित आढळल्यास त्याच्यासोबत काम करणाऱ्या व्यक्तीलाही पुढील 14 दिवस ऑफिसमध्ये येण्यास परवानगी देऊ नये. यासंबंधी आरोग्यविभागाने दिलेल्या आदेशांचं पालन करणं आवश्यक असणार आहे. 

लॉकडाऊन ५ : शाळा सुरू करण्याबाबत शालेय विभागाचे महत्वाचे धोरण

 

Read More