Marathi News> मुंबई
Advertisement

Raj Thackeray | केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या भेटीला

केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) हे मनसेप्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांच्यात राहत्या घरी शिवतिर्थावर गेले आहेत. 

Raj Thackeray | केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या भेटीला

मुंबई : राजकीय वर्तुळातून अतिशय मोठी बातमी समोर येत आहे. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) हे मनसेप्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांच्यात राहत्या घरी शिवतिर्थावर गेले आहेत. मनसेप्रमुखांनी काल गुढीपाडव्याला महाविकास आघाडीवर सडकून टीका केली. या टीकेनंतर अवघ्या काही तासांमध्ये झालेल्या या भेटीमुळे राजकारणात चर्चांना उधाण आलं आहे. (union minister nitin gadkari visited to mns chief raj thakceray shivtirth home mumbai what is secret of visit)

राज्यातील या 2 महत्त्वाच्या नेत्यांमध्ये गेल्या 40 मिनिटांपासून चर्चा सुरु असल्याची माहिती मिळत आहे. भाजप आणि मनसे यांच्यातील युतीबाबत ही चर्चा असल्याचंही राजकीय वर्तुळात म्हटलं जात आहे. दरम्यान या भेटीमुळे राजकारण अनेक उलट-सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. 

भेटीमागचं 'राज' काय?

या 2 दिग्गज नेत्यांच्या भेटीबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. मात्र या भेटीमागचं 'राज' अजूनही स्पष्ट नाही. मात्र मनसेप्रमुखांनी गुढीपाडव्याला केलेल्या भाषणाचं कौतुक करण्यासाठी गडकरी शिवतिर्थावर गेल्याचं म्हटलं जात आहे.

Read More