Marathi News> मुंबई
Advertisement

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंचे वृक्ष प्रेम दिखावूपणाचे - मनसे

वरळी मतदार संघात झाडांची कत्तल केल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) केला आहे. 

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंचे वृक्ष प्रेम दिखावूपणाचे - मनसे

मुंबई : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Environment Minister Aditya Thackeray) यांच्या वरळी मतदार संघात झाडांची कत्तल (Tree Cutting) केल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) केला आहे. मुंबई महापालिकेचे होर्डिंग लावण्यासाठी ही झाडे कापण्यात आल्याचा आरोप मनसेने केला आहे.

धक्कादायक म्हणजे काही झाडांना इंजेक्शन देऊन मारण्याचा प्रयत्नही केला गेला आहे, असा थेट आरोपही मनसेने केला आहे. आदित्य ठाकरे यांचे हेच का पर्यावरण प्रेम? त्यांचे हे प्रेम दिखावू असल्याची टीका मनसेने केली आहे. 

वरळी सीफेस इथे असणाऱ्या महानगर पालिकेच्या शाळेच्या शेजारी होंर्डिंग लावण्यासाठी झाडांची कत्तल करण्यात आली आहे. मुंबई महानगर पालिका आयुक्तांकडे मनसेने तक्रार केली असून संबंधितांवर गुन्हे दाखल कऱण्याची मागणी केली आहे. 

Read More