Marathi News> मुंबई
Advertisement

मुंबई-गोवा महामार्गावर ३ तास वाहतूक ठप्प

मुंबई गोवा महामार्गावरील कर्नाळा खिंडीत ३ तास वाहतूक ठप्प झाली 

मुंबई-गोवा महामार्गावर ३ तास वाहतूक ठप्प

मुंबई : मुंबई गोवा महामार्गावरील कर्नाळा खिंडीत ३ तास वाहतूक ठप्प झाली आहे. वाढत्या पावसाचे परिणाम ठिकठिकाणी पाहायला मिळत आहेत. मुंबई-गोवा महामार्गावरील कर्नाळा खिंडीत  मोरीचे बांधकाम खचल्याचे समोर येत आहे. जोरदार पावसाने माती रस्त्यावर आल्याने वाहन चालकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. तरी एकेरी वाहतूक संथगतीने सुरू असून नागोठणे, अलिबाग, महाड, रत्नागिरी कडून पनवेल कडे जाणाऱ्यांनी खोपोली मार्ग अवलंबला आहे. मुंबईसह इतर ठिकाणी पावसाचा जोर आता ओसरला असला तरी वाहतूक कोंडी अद्याप कायम आहे. सकाळपासूनच पाऊस असल्याने नागरिकांनी बाहेर न जाणेच पसंद केले. त्यामुळे रस्त्यांवर फारशी गर्दी पाहायला मिळत नव्हती.

महामार्गावर रांगा 

वसईत गेल्या २४ तासात १८४  mm पाऊस झाला आहें तर मुंबई अहमदाबाद महामार्गावर मोठया प्रमाणावर पाणी साचले आहे. संपूर्ण रस्त्यावर पाणी साचल्याने दोन ही मार्गावर ७ ते ८ किलोमीटरच्या रांगा आहेत. किनारा हॉटेल ते घोडबंदर ब्रिज पर्यत ट्राफिक जाम आहे. या भागात अर्धा फूट पाणी जमा झाले आहे. जर असाच पाऊस पडत रहिला तर हा महामार्ग बंद करवा लागेल.

Read More