Marathi News> मुंबई
Advertisement

तुमच्याकडे फाटक्या, मळक्या नोटा आहेत? अशा बदलून घ्या!

 फाटक्या नोटा तुमच्याकडे असतील तर टेन्सन घेऊ नका. या नोटा बँकांमधून अशा बदलून घेऊ शकता.

तुमच्याकडे फाटक्या, मळक्या नोटा आहेत? अशा बदलून घ्या!

मुंबई : अनेक वेळा आपल्याकडे नकळत फाटक्या किंवा मळक्या नोटा येतात. कधी एटीएममधून तर कधी भाजी किंवा बाजाररहाट करताना येतात. मात्र, फाटक्या नोटा किंवा खराब झालेल्या नोटा दुकानदार घेत नाही. त्यामुळे या नोटांचे करायचे काय, असा प्रश्न प्रत्येकाला पडतो. मात्र, फाटक्या नोटा तुमच्याकडे असतील तर टेन्सन घेऊ नका. या नोटा बँकांमधून अशा बदलून घेऊ शकता.

नकळत एखादी फाटकी नोट आपल्या हातात आली तर ती नोट खरेदी करताना घेतली जात नाही. त्यामुळे मनस्थाप सहन करावा लागतो. मात्र, या त्रासातून तुमची सुटका होणार आहे. रिझर्व्ह बँकेने 'मळलेल्या' नोटेचीही व्याख्या केली आहे. यामध्ये सततच्या वापराने, घामाने मळलेल्या नोटांचा आणि एकाच नोटेचे तिच्या सर्व वैशिष्ट्यांसह दोन तुकडे चिकटवून जोडलेली नोट यांचा समावेश होतो. तसेच फाटकी नोटही बॅंकेत बदलून मिळेल, असा नियम करण्यात आलाय. जरी तुमचे त्या बॅंकेत खाते नसेल तरीही फाटकी नोट बदलून देणे बंधनकारक आहे.

fallbacks

- रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार, मळलेल्या, फाटलेल्या नोटा प्रत्येक बँकेने घेणे स्वीकारणे अपेक्षित आहे. त्यामुळे तुम्ही जवळच्या कोणत्याही बँकेच्या शाखेत जाऊन नव्या नोटा घेऊ शकता.

- फाटकी किंवा मळलेली नोट बदलण्यासाठी तुम्हाला कोणतीही रक्कम द्यावी लागणार आहे. मळलेल्या, फाटक्या नोटा येथे बदलून मिळतील, अशी पाटी प्रत्येक बँकेत लावण्यात यावी, असे रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना आदेश दिले आहेत.  

- सरकारची विविध देयके उदाहरणार्थ पाण्याचे बील, वीजबील, घरपट्टी, स्वच्छता कर, मालमत्ता कर तुम्ही फाटक्या किंवा मळक्या नोटा देऊन भरु शकता.

- फाटक्या किंवा मळक्या नोटा नोटा तुम्ही तुमच्या खात्यात रक्कम भरण्यासाठी वापरु शकता. या नोटा रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार पुन्हा सार्वजनिक वापरासाठी बाहेर येणार नाहीत. त्या रिझर्व्ह बँकेत पाठवल्या जातील.

- जर तुम्ही ५ नोटांपर्यंत नोटा बदलण्याचा प्रयत्न करत असाल आणि जर संबंधित शाखा ते देण्यास सक्षम नसेल तरीही तुम्ही त्या नोटा भरु शकता. त्या नोटांच्या बदल्यात तुम्हाला एक पावती मिळेल. त्यानंतर ३० दिवसांच्या आत तुम्हाला फाटक्या किंवा मळक्या नोटांच्या बदल्यातील नव्या नोटा परत मिळतील.

Read More