Marathi News> मुंबई
Advertisement

गणेश विसर्जनानिमित्त उद्या तिनही मार्गांवरील मेगाब्लॉक रद्द

 भाविकांचा प्रवास सुखरूप व्हावा, यासाठी तिन्ही मार्गावरील ब्लॉक रद्द करण्यात आला आहे.

गणेश विसर्जनानिमित्त उद्या तिनही मार्गांवरील मेगाब्लॉक रद्द

मुंबई : रविवारी म्हणजे उद्या रेल्वेनं मेगाब्लॉक रद्द केलाय. रेल्वे मार्ग दुरूस्तीसाठी दर रविवारी हा मेगाब्लॉक घेण्यात येतो. पण प्रवाशांची गैरसोय  मुंबईत गणेश विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेता, रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतलाय.. यामुळे मध्यसह हार्बर, ट्रान्स हार्बर आणि पश्चिम रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळालाय. अनंत चतुर्दशीच्या दिवशी शहरातील प्रमुख रस्त्यांवरून श्रींची विसर्जन मिरवणूक मार्गस्थ होते. उद्या गणेश विसर्जनानिमित्त मोठ्या प्रमाणात भाविक घराबाहेर पडत असतात. मेगाब्लॉकमुळे प्रवाशांचा खोळंबा होऊ नये म्हणून मेगाब्लॉक रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आले.

तिन्ही मार्गावरील ब्लॉक रद्द 

 एकाच वेळी अनेक रूपात असलेल्या लाडक्या बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी विसर्जनाच्या दिवशी दुतर्फा रांगा लागतात. त्यामुळे लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी येणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये आणि विसर्जन मिरवणुकीनंतर भाविकांचा प्रवास सुखरूप व्हावा, यासाठी तिन्ही मार्गावरील ब्लॉक रद्द करण्यात आला आहे.
 

Read More