Marathi News> मुंबई
Advertisement

मुंबईत लोकल ट्रेन सुरु करण्यासाठी उद्या मनसेचा सविनय कायदेभंग

जनतेच्या हितासाठी मनसेचा रेल्वे प्रवास...

मुंबईत लोकल ट्रेन सुरु करण्यासाठी उद्या मनसेचा सविनय कायदेभंग

देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई : मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांना रेल्वे पोलिसांकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. रेल्वे सुरु व्हावी या मागणीला घेऊन सोमवारी मनसे सविनय कायदेभंग आंदोलन करणार आहे. रेल्वे पोलिसांकडून आंदोलन न करण्याची नोटीसद्वारे सूचना देण्यात आली आहे. आंदोलन केल्यास नियमानुसार कारवाई करणार असल्याचं रेल्वे पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

मनसेकडून रेल्वे सेवा सुरु करण्यासाठी, सरकारला वारंवार विनंती करण्यात आली आहे. मात्र सरकार अद्यापही रेल्वे सुरु करत नाही. त्यामुळे कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदालापूर, पालघरपासून येणाऱ्या अनेक लोकांचे प्रचंड हाल होत आहेत. विनंती करुनही सरकार ऐकत नसल्याने सोमवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून सविनय कायदेभंग करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. सोमवारी जनतेच्या हितासाठी मनसे रेल्वेतून प्रवास करणार असल्याचं संदीप देशपांडे यांनी सांगितलं आहे.

लॉकडाऊन काळात रेल्वे सेवा केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच सुरु आहे. इतर लोकांना बसने प्रवास करावा लागतो आहे. बस प्रवासात लोकांची मोठी गर्दी होत आहे. चाकरमान्यांना बसमधून प्रवास करण्यासाठी 2-2 तास लाईनमध्ये उभं राहावं लागतं आहे. त्यामुळे अनेकांचे मोठे हाल होत आहेत. यापूर्वी मनसेकडून मुख्यमंत्र्यांना रेल्वे सुरु करण्यासाठी पत्रही पाठवण्यात आलं होतं. अनेकदा मनसेने रेल्वे सुरु करण्याची मागणी सरकारकडे केली आहे.

Read More