Marathi News> मुंबई
Advertisement

Tinder गर्लचा मुंबईत नवा स्कॅम! 2 तासांच्या डेटसाठी 60 हजाराचं बिल, 12 तरुण ठरले डेटिंग घोटाळ्याचे बळी

Mumbai dating scam : मुंबईत डेटिंग अ‍ॅपचा मोठा घोटाळा उघड झालाय. मुंबईतील 12 पुरुषांना मोठा आर्थिक फटका बसलाय. 

Tinder गर्लचा मुंबईत नवा स्कॅम! 2 तासांच्या डेटसाठी 60 हजाराचं बिल, 12 तरुण ठरले डेटिंग घोटाळ्याचे बळी

Mumbai dating scam : एकटेपणा हा खूप मोठा शाप मानला जातो. आज अनेक जण धावपळीच्या जगात एकटे पडले आहेत. अशात ते डेटिंग अ‍ॅपवर आपला एकटेपणा नाहीसा करण्यासाठी जातात. या अ‍ॅपवर दोन अनोखळी व्यक्तींची आवड निवड जुळल्यास ते भेटतात आणि त्यातून सुरु होतो डेटिंगचा महाघोटाळा...

काय आहे मुंबई डेटिंग घोटाळा?

कील आणि सामाजिक कार्यकर्ती असेलेल्या दीपिका नारायण भारद्वाज यांनी मुंबईतील डेटिंग घोटाळाचा पर्दाफाश केलाय. एक तरुणी छान छान बोलून त्यांना आपल्याकडे आकर्षित करते. मग त्यांना डेटिंगवर येण्यास भाग पाडते. दोन तासात खा, प्या आणि घरी जा. यासाठी ती तरुणी 45, 50 ते 60 हजाराच्या बिलाचा चुना लागतो. विशेष म्हणजे हे पैसे हॉटेल मॅनेजमेंट आणि तिथे असलेले बाऊन्सर वसूल करतात. 

मुंबईच्या अंधेरी पश्चिमेकडील वीरा देसाई रोड परिसरात हा घोटाळा उघड झालाय. या ठिकाणी असलेल्या द रेड रूम आणि गॉड फादर नावाच्या हॉटेलमध्ये हा धक्कादायक प्रकार उघडतोय. डेटिंगच्या या महाजाळ्यात मुंबईतील आतापर्यंत 12 पुरुषांना चुना लागलाय. 

दीपिका नारायण भारद्वाज यांनी ट्वीटमध्ये लिहिलंय की, मुंबई डेटिंग घोटाळा उघड! द गॉडफादर क्लब अंधेरी वेस्ट. निर्लज्जपणे घोटाळा रोज फसवणूक. आतापर्यंत 12 जणांची फसवणूक. टिंडर, बंबलच्या माध्यमातून हा सापळा रचला. बिलाची रक्कम 23 हजार ते 61 हजारपर्यंत. एकाच मुलीने केली 3 पुरुषांची फसवणूक'

शेअर सोशल मीडियावर व्हायरल झाली असून चार लाखांहून अधिक व्ह्यूज आले आहेत. यामुळे लोकांना विविध कमेंट्स करत आहेत. 

त्यातील काहींनी धक्कादायक खुलासा केलाय. एका यूजर्सने म्हटलं की, माझा मित्रही इथे फसला. आशा आहे की, पोलीस रेस्टॉरंटवर काही कारवाई करतील. पुढे एकाने म्हटलंय की, मी फसवणूक झालेल्या मित्राला ओळखतो.
एका युजर्सने म्हटलं की, असंच घडतंय, कदाचित तीच जागा आणि समजा तीच मुलगी किंवा दुसरी कोणी असेल. पण हे संपूर्ण मुंबईत, संपूर्ण भारतात घडत आहे.

'या' अ‍ॅपवर 13 भाषांमध्ये संवाद 

भारतात Tinder, Bumble, Badoo, woo सारख्या अ‍ॅप लोकप्रिय आहे. तर 2012 मध्ये सुरु झालेला Tinder हे Dating App सर्वाधिक लोकप्रिय आहे. Tinder वर 13 भाषांमध्ये तुम्ही संवाद साधू शकतो. 
एकंदरीत मुंबईत डेटिंगच्या नावाखाली मोठा घोटाळा सुरु आहे. प्रत्येकाच्या हाताली मोबाईल इथे अनेकांच्या घात करत आहेत. 

 

Read More