Marathi News> मुंबई
Advertisement

मॅनहोलमध्ये गुदमरून तीन कामगारांचा मृत्यू

मॅनहोलमध्ये काम करत असताना तीन कामगारांचा गुदमरुन मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर येतेयं. 

मॅनहोलमध्ये गुदमरून तीन कामगारांचा मृत्यू

डोंबिवली : डोंबिवलीत मॅनहोलमध्ये काम करत असताना तीन कामगारांचा गुदमरुन मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर येतेयं. मृत झालेले तिघेही मॅनहोल साफ करणारे कंत्राटी कामगार असल्याचं सांगण्यात येतंय. डोंबिवली पूर्वेतील खंबाळपाडा परिसरात संध्याकाळी ४ च्या सुमारास घटना घडली.

देविदास चंद्रभान पाजगे (३०), महादेव धोंडीराम झोपे (३८) आणि चंद्रभान अशी तीन कामगारांची नावं आहेत. घटनास्थळी धाव घेत अग्निशमन दलाने तिघांचे मृतदेह बाहेर काढले आहेत.

तिघेही गुदमरले 

एमआयडीसीचं चेंबर साफ करण्यासाठी एक जण उतरला. मात्र गॅसमुळे तो गुदमरला, त्याला वाचवायला दुसरा उतरला, तोही गुदमरला, त्यामुळे या दोघांना वाचवायला तिसरा उतरला, मात्र या तिघांचाही गुदमरून मृत्यू झाला.

सुरक्षेकडे दुर्लक्ष

मॅनहोलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे सुरक्षेचं साहित्य देणं अपेक्षित असतं. हे नियम डावलले जात असल्याने कर्मचाऱ्यांच्या जीवावर बेतत असल्याच्या घटना वारंवार समोर येतात. या घटनेतही या तिन्ही कर्मचाऱ्यांकडे कुठलंही सुरक्षा साहित्य नसल्याचं समोर आलंय. 

Read More