Marathi News> मुंबई
Advertisement

'पीएनबी' अपहार : बँकेच्या निवृत्त अधिकाऱ्यासह दोघांना अटक

पंजाब नॅशनल बॅंक घोटाळा प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांना आज न्यायालयात करणार हजर करण्यात येणार आहे. दरम्यान, याआधी हिरे व्यापारी नीरव मोदी परदेशात पळून गेलाय.

'पीएनबी' अपहार : बँकेच्या निवृत्त अधिकाऱ्यासह दोघांना अटक

मुंबई : पंजाब नॅशनल बँक अपहार प्रकरणी तिघांना अटक करण्यात आलीय. 

यात या बँकेचा निवृत्त अधिकारी गोकुळनाथ शेट्टी याचाही समावेश आहे. शेट्टी हा पीएनबीच्या ब्रीच कँडी शाखेचा उपव्यवस्थापक होता. या घोटाळ्यातील अटकेची ही पहिली मोठी कारवाई आहे. 

शेट्टीसह सिंगल विंडो ऑपरेटर मनोज खरात आणि नीरव मोदी ग्रुप ऑफ फर्म्सचा अधिकृत स्वाक्षरीकर्ता हेमंत भटलाही सीबीआयने अटक केलीय.

सीबीआयने ही कारवाई केलीय. या तिघांनाही सीबीआयच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आहे.

दरम्यान, याअगोदरच पंजाब बँक अपहार प्रकरणातील प्रमुख आरोपी आणि हिरे व्यापारी नीरव मोदी परदेशात पळून गेलाय. पीएनबी अपहारप्रकरणी १७ ठिकाणी छापे मारण्यात आले आहेत. बँकेचे १८ कर्मचारी निलंबित करण्यात आले आहेत. तर नीरव मोदी आणि मेहूल चोकसीचा पासपोर्ट रद्द करण्यात आलाय. तसेच अपहारप्रकरणी तिघांविरोधात इंटरपोलची नोटीस बजावण्यात आली आहे.

Read More