Marathi News> मुंबई
Advertisement

Mumbai corona : मुंबई लोकल, हॉटेलमध्ये उद्यापासून निर्बंध? काय म्हणाल्या महापौर?

मुंबईत लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आला नसला तरी मोठ्या प्रमाणात निर्बंध लागण्याची शक्यता आहे. स्वत: महापौर किशोरी पेडणेकर यांनी ही शक्यता वर्तवली आहे. मुंबईत उद्यापासूनच हे कठोर निर्बंध लागण्याची शक्यता आहे.

Mumbai corona : मुंबई लोकल, हॉटेलमध्ये उद्यापासून निर्बंध? काय म्हणाल्या महापौर?

मुंबई : मुंबईत लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आला नसला तरी मोठ्या प्रमाणात निर्बंध लागण्याची शक्यता आहे. स्वत: महापौर किशोरी पेडणेकर यांनी ही शक्यता वर्तवली आहे. मुंबईत उद्यापासूनच हे कठोर निर्बंध लागण्याची शक्यता आहे.

मुंबईत कोण-कोणते निर्बंध लागण्याची शक्यता?

  1. ट्रेनमधून पुन्हा एकदा फक्त अत्यावश्यक कर्मचाऱ्यांना प्रवेश दिला जाण्याची शक्यता

  2. मॉल्स, सिनेमागृहे पूर्णपणे बंद होण्याची शक्यता

  3. हॉटेल 50% उपस्थितीने चालवले जाणार

  4. खाजगी ऑफिसेस 2 शिफ्टमध्ये चालवण्यावर भर

  5. दुकान आणि बाजारपेठा एक दिवस आड सुरू ठेवले जाण्याची शक्यता

  6. मुंबईतील धार्मिक स्थळ पूर्णपणे बंद करण्याची शक्यता

मुंबईत दररोज वाढणारी कोरोनाची रुग्णसंख्या ही 5 हजाराच्या घरात आहे. मुंबईतील कोरोनाग्रस्तांचे बरे होण्याचे प्रमाणही 85 टक्क्यांवर घसरलेले आहे. दररोज मृतांची संख्याही 10च्या घरात आहे. त्यामुळे मुंबईत लॉकडाऊन लागणार की काय, अशी शक्यता वर्तवण्यात आलेली. मात्र आता महापौरांनीच निर्बंध कडक करण्याचे संकेत दिले आहेत.

Read More