Marathi News> मुंबई
Advertisement

तुम्हाला ओळखता येणार नाही 'तारे जमिन पर'मधील निरागस ईशानला, बदलला संपूर्ण लूक

आमिर खानच्या तारे जमीन पर या चित्रपटात दर्शील सफारीने बालकलाकाराची भूमिका साकारली होती.

तुम्हाला ओळखता येणार नाही 'तारे जमिन पर'मधील निरागस ईशानला, बदलला संपूर्ण लूक

मुंबई : बॉलीवूड स्टार्सचं बालपण देखील कोणत्याही सामान्य व्यक्तीच्या बालपणीच्या दिवसांसारखे गेलं आहे. तरीही, पडद्यावरचे कलाकार बालपणी कसे दिसायचं, हे जाणून घेण्याची चाहत्यांची इच्छा असते. आता आपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकणाऱ्या 'तारे जमीन पर' चित्रपटातील बालकलाकाराचेच उदाहरण घ्या. आता त्याला पाहून ओळखणं थोडं कठीण झालं आहे.

होय, आमिर खानच्या तारे जमीन पर या चित्रपटात दर्शील सफारीने बालकलाकाराची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील त्याच्या व्यक्तिरेखेचं ​​नाव ईशान अवस्थी होतं, जो फार कमी बोलणारा होता, एक निरागस मुलगा होता जो स्वतःच्या प्रश्नांमध्ये गुंतलेला होता आणि इतरांपेक्षा पूर्णपणे वेगळा होता. या चित्रपटात तो आमिर खानच्या विद्यार्थ्याच्या भूमिकेत होता. त्यावेळी तो फक्त 8 वर्षांचा होता.

पण आता दर्शील फक्त मोठाच झाला नाही तर तो अधिक सुंदरही दिसतो. त्यांचे  फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये तो हँडसम हंक दिसत आहे. त्याचा हा लूक पाहून चाहत्यांना विश्वास बसत नाही की तो छोटा दर्शील आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या चित्रपटाव्यतिरिक्त तो बम बम बोले, मिडनाइट्स चिल्ड्रन यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसला आहे. 2020 मध्ये त्याने टीव्ही अभिनेत्री अनुष्का सेनसोबत एक म्युझिक व्हिडिओही केला होता. याशिवाय 'ये है आशिकी', 'चल यार ट्राय मार' यांसारख्या टीव्ही सीरियल्सचाही तो भाग आहे. मात्र, हे सगळं असूनही तो 'तारे जमीन पर' इशान या नावाने प्रसिद्ध आहे. या चित्रपटातील त्याचा अभिनय इतका जबरदस्त होता की त्यांना चित्रपटासाठी फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा समीक्षक पुरस्कारही मिळाला आहे.

Read More