Marathi News> मुंबई
Advertisement

दूरसंचार विभागात विविध पदांची भरती, मुंबईत मिळेल भरघोस पगाराची नोकरी

India Telecom Job:  दूरसंचार विभागातील आठ विभागांमध्ये एकूण 39 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी 31 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार आहे.

दूरसंचार विभागात विविध पदांची भरती, मुंबईत मिळेल भरघोस पगाराची नोकरी

Telecommunication Department Job: मुंबईत चांगल्या पगाराची नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. दूरसंचार विभागात विविध पदांची भरती सुरु आहे. येथे तुम्हाला चांगले पद आणि पगाराची नोकरी मिळू शकणार आहे. दूरसंचार विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. दूरसंचार विभागातील आठ विभागांमध्ये एकूण 39 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. ही पदे कोणती यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पगार, अर्जाची अंतिम तारीख याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

टेलिकॉम डिपार्टमेंटमध्ये एकूण 39 रिक्त जागा भरल्या जातील. यामध्ये  एएओ ( AAO) ची 1 जागा,  पीएस स्टेनो गॅझेटेडची 1 जागा, पीएस स्टेनो नॉन गॅझेटेडची 1 जागा, सीनियर अकाउंटंटच्या 21 जागा, स्टेनोची 1 जागा, एलडीसी (LDC) च्या 12 जागा,
एमटीएस (MTS) च्या 2 जागा भरण्यात येणार आहेत. 

एएओ पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा 47 हजार 600 ते 51 हजार 100 रुपये, पीएस स्टेनो गॅझेटेड पदासाठी उमेदवारांना दरमहा 44 हजार 900 ते 1 लाख 42 हजार 400, पीएस स्टेनो नॉन गॅझेटेड पदासाठी उमेदवारांना 35 हजार 400 ते 1 लाख12 हजार 400 रुपये, सिनियर अकाउंटंट पदासाठी 35 हजार 400 ते 1 लाख 12 हजार 400 रुपये, स्टेनो पदासाठी उमेदवाराला  25 हजार 500 ते 81 हजार 100 रुपये, एलडीसी (LDC) पदासाठी उमेदवाराला 19 हजार 900 ते 63 हजार 200 रुपये पगार, एमटीएस (MTS) पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 18 हजार ते 56 हजार 900 रुपये पगार दिला जाणार आहे. 

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 ऑक्टोबर 2023 रोजी 56 वर्षांच्या आत असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवारांकडून कोणतेही शुल्क घेतले जाणार नाही. 

दूरसंचार विभागातील पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना मुंबई (महाराष्ट्र) येथे नोकरी करता येईल. यासाठी उमेदवारांकडून ऑफलाईन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. 

31 ऑक्टोबर 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज दूरसंचार विभाग,द जॉइंट कंट्रोलर ऑफ कम्युनिकेशन अकाउंट्स, बीएसएनएल प्रशासकीय इमारत, तिसरा मजला, जुहू रोड. सांताक्रूझ पश्चिम. मुंबई- 400054 या पत्त्यावर पाठवायचे आहेत. दूरसंचार विभागाची अधिकृत वेबसाइट  www.dot.gov.inवर याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. 

Read More