Marathi News> मुंबई
Advertisement

ST कर्मचाऱ्यांच्या आंदोलनानंतर सुप्रिया सुळे सिल्व्हर ओकवर, हात जोडून शांततेचं आवाहन

ST Workers Protest : शरद पवारांच्या निवासस्थानाबाहेर एसटी कामगारांचं आंदोलन

ST कर्मचाऱ्यांच्या आंदोलनानंतर सुप्रिया सुळे सिल्व्हर ओकवर, हात जोडून शांततेचं आवाहन

मुंबई : एसटी कर्मचारी आज अचानकपणे पुन्हा आक्रमक झालेले पाहायला मिळाले. महत्त्वाचं म्हणजे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक येथील निवासस्थानाबाहेर आंदोलन सुरु केले. एसटी कर्मचारी अचानकपणे पवारांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी धडकले. एसटी महामंडळाच्या विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. काल कोर्टाच्या निर्णयानंतर ही आज कर्मचारी अचानक आक्रमक झाले. 

काही आंदोलकांनी थेट शरद पवार निवासस्थानी घुसून चप्पल फेक केली. यावेळी महिला आंदोलक ही आक्रमक झालेले पाहायला मिळाले.  

आंदोलनाची माहिती मिळताच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे सिल्व्हर ओकच्या दिशेने निघाल्या. वाय बी चव्हाण सेंटर येथून त्या सिल्वर ओक या शरद पवारांच्या निवासस्थानी पोहोचल्या आहेत. त्यांनी यावेळी आंदोलकांना हात जोडून शांततेचं आवाहन केलं आहे. चर्चेसाठी तयार आहोत पण शांतता राखण्याचं आवाहन त्यांनी आंदोलकांना केली आहे.

'चप्पल फेकून प्रश्न सुटणार नाही. माझे कुटुंब घरात आहे. त्यांची सुरक्षा मला पाहू द्या. त्यानंतर मी त्यांच्यासोबत बसून चर्चेला तयार आहे.' असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

Read More