Marathi News> मुंबई
Advertisement

आरेतील वृक्षतोडीनंतर किती नवीन झाडे लावलीत, सुप्रीम कोर्टाने मागवला अहवाल

पुढील सुनावणी १५ नोव्हेंबर रोजी

आरेतील वृक्षतोडीनंतर किती नवीन झाडे लावलीत, सुप्रीम कोर्टाने मागवला अहवाल

मुंबई : आरेमधील वृक्षतोडीवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीमध्ये न्यायालयाने आरेमधील तोडलेली झाडे आणि तोडलेल्या झाडांच्या बदल्यात आणखी किती झाडे लावली  याबाबतचा संपूर्ण अहवाल सादर करण्याचे आदेश एमएमआरसीएलला (MMRCL) दिले आहेत. 

सर्वोच्च न्यायालयाने आरेमधील वृक्षतोडीवरील बंदीचा आदेश कायम ठेवला असून याबाबतची पुढील सुनावणी १५ नोव्हेंबर रोजी होणार असल्याचे सांगितले आहे. 

आज झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने, एमएमआरसीएलचा प्रकल्प असलेल्या मेट्रो कारशेडच्या बांधकामावर कोणतीही स्थगिती  नसल्याचेही स्पष्ट केले आहे. 

  

आरे हे जंगल नाही, असे नमूद करत मुंबई उच्च न्यायालयाने तेथील वृक्षतोडीस स्थगिती देण्यास नकार दिला होता. त्यानंतर मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळाने एका रात्रीत शेकडो झाडे तोडल्यामुळे वातावरण तापले होते. पर्यावरणप्रेमी लोकांनी वृक्षतोडीला विरोध केला होता. या प्रकरणी २९ जणांना अटकही करण्यात आली होती.

Read More