Marathi News> मुंबई
Advertisement

सुंदर पिचाई यांची मुंबई महापालिकेच्या शाळेला भेट

गुगलतर्फे पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी 'बोलो' अॅपचे अनावरण 

 
सुंदर पिचाई यांची मुंबई महापालिकेच्या शाळेला भेट

जगातील सर्वात मोठ्या सर्च इंजिन गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी शुक्रवारी डी. एन. नगर परिसरातील मुंबई महापालिकेच्या शाळेला भेट दिली. यावेळी त्यांनी सुमारे १५० विद्यार्थ्यासोबत संवाद साधला. गुगलतर्फे पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी 'बोलो' अॅपचे अनावरण यावेळी करण्यात आले. सुरक्षेच्या कारणास्तव शाळा प्रशासनाला त्यांच्या भेटीबाबत कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आली नव्हती. त्यामुळे शाळेतील शिक्षक, विद्यार्थी आणि शिक्षणाधिकारी सुंदर पिचाई यांच्या भेटीमुळे आश्चर्य़ाचकीत झाले. या भेटीनंतर सुंदर पिचाई यांनी 'बोलो' अपबद्दल माहिती देत या अॅपचा वापर करणाऱ्या विद्यार्थ्यांना भेटण्याची संधी मिळाली असे ट्विट केले आहे. 

गेल्या आठवड्यात सुंदर पिचाई यांनी भारतात 'बोलो' अॅपचे अनावरण केले होते. 'बोलो' अॅप रिडींग टुटर अॅप आहे. गुगल आर्टिफिशिअल इंन्टेलिजिन्सद्वारे (GoogleAI) टेक्स-टू-स्पिच अशाप्रकारे याचा वापर केला जाऊ शकतो. 'बोलो' अॅपद्वारे मुलांना वाचन करण्याबाबत शिकवले जाते. यातून मुलांना एखाद्या इंग्रजी शब्दाचा हिंदी अर्थही सांगितला जातो.

Read More