Marathi News> मुंबई
Advertisement

गिरगाव चौपाटीवर स्टिंग रे माशांचा वावर; भाविकांना सतर्कतेच्या सूचना

माशांपासून सावध राहण्याच्या सूचना

गिरगाव चौपाटीवर स्टिंग रे माशांचा वावर; भाविकांना सतर्कतेच्या सूचना

मुंबई: गिरगाव चौपाटी नजीकच्या समुद्रात स्टिंग रे माशांचा वावर आढळून आला आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने अनंत चतुदर्शीच्या दिवशी चौपाटीवर विसर्जनासाठी येणाऱ्या भाविकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. 

गेल्यावर्षी विसर्जनासाठी समुद्रात उतरलेल्या अनेक लोकांना स्टिंग रे माशांनी दंश केला होता. स्टिंग रे माशाच्या दंशांनंतर असह्य वेदना होतात. त्यामुळे प्रशासनाने भाविकांना या माशांपासून सावध राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यासाठी भाविकांनी समुद्रात न उतरता त्याठिकाणी तैनात केलेल्या स्वयंसेवकांकडे गणेशमूर्ती विसर्जनासाठी द्याव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. 

Read More