Marathi News> मुंबई
Advertisement

गणेशोत्सवासासाठी कोकणात जा मोफत, राज्य सरकारचं चाकरमान्यांसाठी गिफ्ट

येत्या 19 सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. राज्यभर मोठ्या उत्साहात गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जातो. विशेषत: कोकणतात हा सण मोठ्या प्रमाणावर साजरा होता. राज्याच्या कानकोपऱ्यात राहाणारे चाकरमणी गणेशोत्सवासाठी आवर्जुन कोकणात जातात. 

 गणेशोत्सवासासाठी कोकणात जा मोफत, राज्य सरकारचं चाकरमान्यांसाठी गिफ्ट

मुंबई : कोकणात गणेशोत्सवासाठी पुण्या-मुंबईहून जाणाऱ्या चाकरमान्यांना राज्य सरकारने मोठं गिफ्ट दिलं आहे. गणेशोत्सवासाठी (Ganeshotsav) कोकणात (Konkan) वाहनांना टोलमाफी जाहीर करण्यात आली आहे. कोकणात जाताना महामार्गावरील विविध टोल नाक्यांवर (Toll Plaza) त्यामुळे आता टोल द्यावा लागणार नाही, पण यासाठी परिवहन खात्याकडून सर्टिफिकेट आणि परवाना असणारे स्टीकर घ्यावे लागणार आहेत. सुमारे दहा हजारांहून अधिक वाहनांना टोल सवलतीचा फायदा होण्याी शक्यता वर्तवली जातेय. 19 सप्टेंबरपासून राज्यात गणेशोत्सावाल सुरुवात होतेय. 16 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर दरम्यान टोलमाफी असणार आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस, सातारा कोल्हापूर मार्गावर ही टोलमाफी असणार आहे. 

गणेश चतुर्थी सण अगदी काही दिवसांवर आला आहे. गणेशोत्सोवासाठी मोठ्या प्रमाणावर चाकरमणी कोकणात जातो. कोकणात जाणाऱ्या सर्व ट्रेनचं बुकिंग आधीपासूनच फूल झालेल्या आहेत. तर अनेक जण रस्तेमार्ग कोकणात जातात. मुंबई गोवा महामार्गाचं काम अद्याप पूर्ण झालेलं नाही. त्यामुळे गणेशोत्सवा दरम्यान मुंबई गोवा महामार्गावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी पुणे कोल्हापूर मार्गे कोकणात जाण्यासाठी टोल माफीची घोषणा अलीकडेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. पण या घोषणेचा अधिकृत जीआर निघाला नसल्याने ही टोलमाफी आहे की नाही याबाबत चाकरमन्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.

पण आता सरकारकडून अधिकृत घोषणा करण्यात आलेली आहे. पुणे आणि कोल्हापूरमार्गे कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या वाहनांना जाताना आणि गणेश विसर्जनानंतर परतणाऱ्या वाहनांना टोलमाफी करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. कोकणात जाणाऱ्या वाहनांना विशेष स्टीकर उपलब्ध करून देण्यात आले होते. यावर्षीही अशी सवलत लागू केल्याची घोषणा करण्यात आली असून, यासाठी स्थानिक पोलीस ठाणे आणि प्रादेशिक परिवहन विभागाकडे वाहनांची नोंदणी करून स्टीकर घ्यावे लागणार आहेत.

मतांसाठी राजकारण्यांची फिल्डिंग
भाजपाने (BJP) कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना खुशखबर दिली आहे. भाजपा कोकणात जाण्यासाठी मुंबईतून (Mumbai) 6 ट्रेन आणि 250 बस सोडणार आहे. त्यामुळे आता कोकणी मते वळवण्यासाठी भाजपाने मोठी खेळी खेळली जात असल्याचे बोललं जात आहे.  शुक्रवार, शनिवार आणि रविवारी अशा तीन दिवशी भाजपा मुंबईतून ट्रेन आणि बसेस सोडणार आहे. यासोबतच मुंबई भाजपच्यावतीने मोदी एक्स्प्रेस ही विशेष गाडी देखील सोडण्यात येणार आहे. 28 ऑगस्टला सकाळी 10 वाजता दादर सावंतवाडी एक्सप्रेस सुटणार आहे. ही गाडी चिपळूण, रत्नागिरी, कणकवली तसेच सावंतवाडी या स्थानकांवर थांबणार आहे. मोदी एक्स्प्रेसचा खर्च भाजपा मुंबईकडून उचलला जाणार आहे.

Read More