Marathi News> मुंबई
Advertisement

एसटी कर्मचाऱ्यांची आंदोलनाची घोषणा, संपाचा दिला इशारा

एसटी कर्मचाऱ्यांच्या कृती संघटनेने एसटी कर्मचाऱ्यांच्या दोन आंदोलनांची घोषणा केलीय. वेतनवाढीबाबतच्या अहवालाची होळी २५ जानेवारीला केली जाणार आहे. तसंच ९ फेब्रुवारीला एसटी कर्मचारी सहकुटुंब आक्रोश मोर्चा काढणार आहेत. 

एसटी कर्मचाऱ्यांची आंदोलनाची घोषणा, संपाचा दिला इशारा

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या कृती संघटनेने एसटी कर्मचाऱ्यांच्या दोन आंदोलनांची घोषणा केलीय. वेतनवाढीबाबतच्या अहवालाची होळी २५ जानेवारीला केली जाणार आहे. तसंच ९ फेब्रुवारीला एसटी कर्मचारी सहकुटुंब आक्रोश मोर्चा काढणार आहेत. 

आंदोलनाची दिशा लवकरच 

हा मोर्चा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी काढायचा की मातोश्रीवर ते लवकरच जाहीर करण्यात येईल. या आंदोलनांनंतरही शासन जागं होत नसेल तर संपाशिवाय पर्याय नसल्याचं कृती समितीने स्पष्ट केलंय. उच्च न्यायालयाच्या आदेशाने गठीत झालेल्या उच्चस्तरीय समितीने एसटी कामगारांसाठी केलेली वेतनवाढीची शिफारस अत्यल्प आहे, असा आरोप करत एसटी कामगार संघटनांनी आज पुन्हा संपाचा इशारा दिला. 

डेपो गेटवर अहवालाची होळी

एसटी कामगार ९ फेब्रुवारी रोजी मुंबईत कुटुंबासह आक्रोश मोर्चा काढणार असून, त्यामध्ये संपाची तारीख निश्चित केली जाणार आहे. तसेच २५ जानेवारी रोजी राज्यातील सर्व डेपो युनीटच्या गेटवर उच्चस्तरीय समितीच्या शिफारस अहवालाची होळीदेखील करण्यात येणार आहे.

वेतनवाढीचा अहवाल सादर

ऑक्टोबरमध्ये राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा पाच दिवसाचा संप झाला होता. त्यावेळी झालेल्या वाटाघाटीत सरकारने १ हजार ७६ कोटींच्या वेतनवाढीचा प्रस्ताव एसटी कामगार संघटनांपुढे ठेवला होता. मात्र संघटनांनी तो फेटाळूल लावला होता. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने यावर तोडगा काढण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने वेतनवाढीसंदर्भातील शिफारशींचा अहवाल नुकताच न्यायालयास सादर केला आहे.

Read More