Marathi News> मुंबई
Advertisement

लसीकरण केंद्रात सापडला 8 फूटी अजगर

गेल्या वर्षभरापासून देशातील प्रत्येकजण कोरोनाच्या कठीण परिस्थितीशी लढा देत आहे.

लसीकरण केंद्रात सापडला 8 फूटी अजगर

मुंबई : लसीकरण केंद्रात 8 फूट लांबीचा अजगर आढळल्यानं एकच खळबळ उडाली. हे लसीकरण केंद्र जम्बो कोविड सेंटरमध्ये उभारण्यात आलं आहे. या कोविड सेंटरमध्ये रुग्ण नसल्यानं इथं लसीकरण केंद्र सुरु करण्यात आलंय. मात्र अचानक लसीकरण केंद्रात अजगर आढल्यानं खळबळ उडाली कोविड सेंटरमध्ये खळबळ उडाली. परंतु नंतर सर्पमित्राच्या मदतीनं या अजगराला पकडण्यात आलं आणि लसीकरण पुन्हा सुरु करण्यात आलं. या अजगराला जंगलात सोडण्यात येणार आहे.

हा अजगर दहिसरच्या लसीकरण केंद्रात सापडला आहे. आजुबाजूला कोणतेही जंगल नसताना हा अजगर नेमका आला कुठुन याचे कारण समजु शकलेलं नाही. परंतु आता या सापाला सर्पमित्रांनी पकडले आहे ज्यामुळे या सेंटरमधील लसीकरण व्यवस्थित सुरु आहे.

गेल्या वर्षभरापासून देशातील प्रत्येकजण कोरोनाच्या कठीण परिस्थितीशी लढा देतायत. राज्यात दुसऱ्या लाटेचा धोका ओसरत असताना तज्ज्ञांकडून तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. यावर लसीकरण हा एकच उपाय असल्याने लोकं लसीकरणासाठी गर्दी करत आहेत.

मुंबईत फेब्रुवारी 2021 च्या मध्यावर आलेल्या दुसऱ्या लाटेत सरासरी पॉझिटिव्हिटी रेट 3.25 इतका होता. मात्र रुग्णवाढ कायम राहिल्याने एप्रिलमध्ये सर्वाधिक म्हणजेच 16.14 टक्के इतका पॉझिटिव्हिटी रेट नोंदवला गेला. ऑगस्ट महिन्यात 26 ते 37 हजार चाचण्या दररोज होत आहेत. चाचण्यांचे सरासरी प्रमाण 32 हजार 500 इतके आहे. दुसऱ्या लाटेत आता पॉझिटिव्हिटी रेट 16.14 टक्क्यांवरून एक टक्क्यावर आला आहे.

Read More