Marathi News> मुंबई
Advertisement

भाडे करार करण्याआधी लक्षात ठेवा अत्यंत महत्वाच्या 5 गोष्टी; शिफ्टींगनंतर वाद नको म्हणून वाचाच

ज्यांचे कामाच्या शहरात स्वतःचे घर नाही ते भाड्याचे घर घेतात. अशावेळी रेंट ऍग्रीमेट करताना कोणतही काळजी घ्यायला हवी याबाबत सविस्तर माहिती हवी.
 

भाडे करार करण्याआधी लक्षात ठेवा अत्यंत महत्वाच्या 5 गोष्टी; शिफ्टींगनंतर वाद नको म्हणून वाचाच

 नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर पुन्हा एकदा जनजीवन सुरळीत होत आहेत. ऑफिसेस सुरू होत आहेत. वर्क फ्रॉम होमचे कल्चर पुढच्या काही दिवसांमध्ये कमी होऊ शकते. ज्यांचे कामाच्या शहरात स्वतःचे घर नाही ते भाड्याचे घर घेतात. अशावेळी रेंट ऍग्रीमेट करताना कोणतही काळजी घ्यायला हवी याबाबत सविस्तर माहिती हवी.
 
 भाडेवाढ कधी होणार?
 सर्वात आधी हे निश्चित करा की, तुम्हाला किती भाडे द्यावे लागणार आहे. आणि भाड्यामध्ये वाढ किती महिन्यानंतर तसेच किती प्रमाणात करण्यात येईल. सर्वसाधारणपणे घरभाड्यामध्ये वाढ ही 10 टक्के होते. 11 महिन्यानंतर ऍग्रीमेट रिन्यू होते. सेक्युरिटी डिपॉझिट कसे परत मिळणार यांबाबत स्पष्टता हवी. घर खाली करताना या बाबी महत्वाच्या ठरतात. कागदपत्रांवर करार रद्द करण्याच्या अटी सुद्धा लिहायला हव्या. तुम्ही दरमहिना पेमेंट कोणत्या माध्यमातून करणार(कॅश, ऑनलाईन इत्यादी)त्याबाबत स्पष्टता ठेवा.
 
 उशीरा भाडे भरल्याने पेनल्टी द्यावी लागेल का?
 ऍग्रीमेटमध्ये भाडे उशीरा दिल्यास कोणत्या पेनल्टीचा उल्लेख केला आहे का? याबाबत तपासा. महाराष्ट्रात शक्यतो एखाद्या महिन्यात उशीरा भाडे भरल्यास आणि घरमालक भाडेकरूचे संवाद चांगला असल्यास पेनल्टी घेतली जात नाही. परंतु तरीदेखील अधिकृत रित्या कागदपत्रावर पेनल्टी संदर्भात काही नियमावली आहेत का हे तपासून घ्या.
 
 भाडे करार बनवण्याच्या आधी घरात काय काय तापासावे? 
 जे घर तुम्ही भाड्याने घेणार आहात. त्या घरातील सर्व गोष्टी तपासून घ्या. भिंती, स्टाइल, पेंट, इलेक्ट्रिसिटी, किचन, बाथरूम, विन्डो इत्यादी. या गोष्टींपैकी काहीही खराब किंवा नादुरूस्त असल्यास मालकाशी बोलून घ्या.
  
 घराच्या मेंटनन्सची आवश्यकता पडली तर त्याचा खर्च कोण करणार?
 घराच्या रेग्युलर मेंटनन्सचा खर्च कोणी करायचा याबाबत ऍग्रीमेटमध्ये स्पष्टता असायला हवी. शिफ्ट झाल्यानंतर वाद नको. यामध्ये इलेक्ट्रिक वायरिंगपासून ते नळ किचनमधील वस्तू इत्यादींच्या नादुरूस्तीचा खर्च कोण किती कसा करणार त्याबाबत ऍग्रीमेटमध्ये स्पष्टता ठेवा.
 
 अन्य नियम आणि शर्थीवर लक्ष ठेवा?
 ऍग्रीमेटमध्ये नियम आणि शर्थी लिहलेल्या असतात. त्यासाठी रेंट ऍग्रीमेटला काळजीपूर्वक वाचा. अनेक छोट्यामोठ्या गोष्टी आपल्या वाचनातून सूटतात. नंतर त्याचा त्रास होऊ शकतो. जसे की, पार्किंग, पाळीव प्राणी, सोसायटीतील कचरा व्यवस्थापन इत्यादी 
 रेंट ऍग्रीमेट सोबतच सोसायटीचे ना हरकरत प्रमाणपत्राची आवश्यकता  पडल्यास ते देखील पूर्ण करा.

 

Read More