Marathi News> मुंबई
Advertisement

vikas dubey encounter : 'विकास दुबेसारखे लोक पोसणं राजकारण्यांची गरज'

वाचा संजय राऊत नेमकं काय म्हणाले....

vikas dubey encounter : 'विकास दुबेसारखे लोक पोसणं राजकारण्यांची गरज'

मुंबई : कानपूर kanpur मुख्य आरोपी कुख्यात गुंड विकास दुबे याच्या encounter एन्काऊंटरचं शिवसेनेकडून समर्थन करण्यात आलं आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी उत्तर प्रदेश पोलिसांकडून करण्यात आलेल्या या कारवाईवर प्रश्न उपस्थित करु नयेत अशी प्रतिक्रिया दिली आहे. ज्या गुंडांनी पोलिसांची हत्या केली त्या घटनेवर प्रश्न उपस्थित झाले पाहिजेत. पोलिसांवर प्रश्न उपस्थित करु नयेत.

विकास दुबेचा vikas dubey  एन्काऊंटर हा कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली. शिवाय बेजबाबदार वक्तव्य करत पोलिसांचं खच्चीकरण करु नये अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. 'सामना' कार्यालयात माध्यमांशी संवाद साधतेवेळी त्यांनी या एन्काऊंटवर आपली प्रतिक्रिया देत पोलिसांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मृत्यूचा सूड घेतला आहे, असं म्हणत या कारवाईचं समर्थन केलं. 

उत्तर प्रदेश किंवा योगींचा हा प्रश्न नाही. पण, देशात इतर कोणत्याही भागात असं झाल्याच पोलीस त्याला जीवंत सोडणार नाहीत. आपल्या सहकाऱ्यांच्या मृत्यूचा सूड ते कायम घेतात. त्यामुळं जे झालं त्याचं राजकारण होता कामा नये; असं म्हणत मुंबईत़ील एन्काऊंटर स्पेशलिस्टचं उदाहरण त्यांनी दिलं. शिवाय दिल्ली, हैदराबादमध्ये झालेल्या अशाच कारवायांचं उदाहरण देत आपण खोट्या चकमकीचं समर्थन करत नसल्याची बाब त्यांनी स्पष्ट केली. यापुढंही आपण खोट्या चकमकीचं समर्थन करणार नाही, या भूमिकेवर ते ठाम राहिले. 

 

आधी राजकारणी गुन्हेगारांचा वापर करत होते, आता गुन्हेगार राजकारणात येऊ पाहत आहेत असं म्हणत गुन्हेगारीच्या राजकारणाचा धोका राऊतांनी सर्वांसमक्ष मांडत विकास दुबेसारखी लोकं निर्माण केली जाणं आणि ती पोसणं ही राजकारण्यांची गरज असल्याचं वक्तव्य केलं. विकास दुबेचा एका राजकीय पक्षाशी संबंध असल्याचं म्हणत एका पक्षाकडून त्याला तिकिटही मिळणार असल्याचा गौप्यस्फोट राऊतांनी केला. पण, त्यानं शरणागती पत्करल्यामुंळ तसं होऊ शकलं नाही, हा मुद्दाही त्यांनी मांडला. एकंदरच विकास दुबे एन्काऊंटर प्रकरणी कोणत्याही प्रकारे पोलिसांचं खच्चीकरण होईल अशी भूमिका राजकीय पक्षानं घेऊ नये हाच सूर सातत्यानं आळवल्याचं पाहायला मिळालं. 

 

Read More